औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यात गाजत असलेल्या तीस-तीस घोटाळ्यात रोज नवनवीन माहिती समोर येत असून, याप्रकरणी आतापर्यंतची मोठी माहिती महाराष्ट्र टाइम्सच्य हाती लागली आहे. या घोटाळ्याप्रकरणी अटक असलेल्या संतोष राठोडने व्यवहाराच्या नोंदी करून ठेवलेल्या डायरीत दोन मंत्री, एक आमदार, डीवायएसपी आणि एका पोलीस निरीक्षकाच नाव असल्याचं समोर आलं आहे. या डायरीशी संबधित आणि राठोडच्या जवळच्या एका व्यक्तीने ही माहिती दिली असून, पोलीस सूत्रांनी सुध्दा याला दुजोरा दिला आहे.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांना संतोष राठोडच्या माहितीवरून त्याचा नातेवाईक राजेंद्र देविदास पवार (रा. रोहिदासनगर, सातारा परिसर) याच्‍याकडून पैशांचा हिशोब असलेल्या तीन डायऱ्या पोलिसांनी जप्‍त केल्या होत्या. ज्यात ३०० पेक्षा अधिक नावं आहेत. विशेष म्हणजे यात सत्ताधारी पक्षातील एका आमदाराचे सुद्धा नाव असून त्याने तब्बल ७५ लाख रुपयांची गुंतवणूक केली होती. तर एका मंत्र्यांचा जवळच्या पेट्रोल पंप चालकाने एकदा ७ तर एकदा ६ कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्याला ३०,७० आणि एकदा १ कोटींचा परतावा सुद्धा मिळाला होता. अशी माहिती राठोडच्या जवळच्या व्यक्तीने दिली आहे.

लाल परीची चाकं अखेर धावली, ‘या’ जिल्ह्यात १०४८ कर्मचारी कामावर हजर
तसेच दोन मंत्र्यांनी सुद्धा राठोडकडे गुंतवणूक केली आहे. सोबतच एक डीवायएसपी आणि एक पोलीस निरीक्षक यांनी सुद्धा तीस-तीस मध्ये गुंतवणूक केली आहे. विशेष म्हणजे सर्वांना परतावा देतांना कुणाला ७,१०,२५,३० आणि ४० व ६० टक्के पर्यंत व्याज परत देण्याच्या नोंदी या डायरीत करण्यात आल्या आहेत.

सर्वांचे पैसे परत मिळतील…

या डायरीबद्दल माहिती देणाऱ्या राठोडच्या जवळच्या व्यक्तीने नावाचा खुलासा न करण्याच्या अटीवर सर्व माहिती दिली. विशेष म्हणजे पोलिस सूत्रांनी सुद्धा या सर्व माहितीला दुजोरा दिला आहे. तर राठोड याचे सर्व पैसे येण्यास कोरोनामुळे उशीर झाला. पण राठोड याला सर्वांचे पैसे द्यायचे आहेत. तसेच पहिल्या टप्प्यात कुणाल आणि दुसऱ्या टप्प्यात कुणाला द्यायचे हे सुद्धा ठरलेलं होते. पण तक्रार दाखल झाल्यानं सर्व गोंधळ उडाला,असेही हा व्यक्ती म्हणाला.

प्रजासत्ताक दिनी एसटी कर्मचाऱ्यांचा मोठा निर्णय, ३ महिन्यापासून पगार मिळाला नाही म्हणून…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here