हल्ली उठसूट कोणालाही पद्म पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्कार नाकारले जातात, हे चित्र बरोबर नाही. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिवंतपणी तुम्ही त्यांची किंमत करत नाही.

देवेंद्र फडणवीस गोव्यात चांगलं काम करत आहेत, मेहनत घेत आहेत.
हायलाइट्स:
- गांधी कुटुंबातील कोणीही बाळासाहेबांच्या जयंतीला ट्विट केले नाही म्हणून देवेंद्र फडणवीस यांना झालेल्या वेदना आणि दु:ख मी पाहत होतो
- बाळासाहेब ठाकरे यांना पद्मविभूषण किंवा भारतरत्न पुरस्कार द्यावासा का वाटला नाही
संजय राऊत बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी मरणोत्तर पद्म पुरस्कार देण्याची प्रथा थांबवावी, असे म्हटले. पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री बुद्धदेव भट्टाचार्य यांच्यासह राज्यातील तीन लोकांना पद्म पुरस्कार मिळाला आहे. या तिघांनीही पद्म पुरस्कार नाकारला आहे. पुरस्कार देताना त्यांना विचारणा झाली नव्हती. हल्ली उठसूट कोणालाही पद्म पुरस्कार दिले जातात. त्यामुळे पुरस्कार नाकारले जातात, हे चित्र बरोबर नाही. अनेकांना मरणोत्तर पुरस्कार देण्यात आले आहेत. जिवंतपणी तुम्ही त्यांची किंमत करत नाही. बालाजी तांबे यांना गेल्या सात वर्षांमध्ये पुरस्कार का देण्यात आला नाही? या व्यक्ती हयात असताना त्यांना पुरस्कार का देण्यात आले नाहीत. पण मरणोत्तर पुरस्कार देण्याची प्रथा थांबायला हवी, असे संजय राऊत यांनी म्हटले.
गोव्यात भाजपच्या २२ काय ४० जागा निवडून याव्यात; राऊतांची खोचक टिप्पणी
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गोवा विधानसभा निवडणुकीत भाजपच्या २२ जागा सहज निवडून येतील, असे म्हटले. त्यांच्या या वक्तव्याला संजय राऊत यांनी खोचकपणे प्रत्युत्तर दिले. गोव्यात देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रभारी आहेत. मग चंद्रकांत पाटील मध्येच कुठे घुसले? देवेंद्र फडणवीस गोव्यात चांगलं काम करत आहेत, मेहनत घेत आहेत. चंद्रकांत पाटील म्हणतात तशा भाजपच्या २२ काय ४० जागा निवडून येऊ देत. आमच्या त्यांना शुभेच्छा असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.
या बातम्यांबद्दल अधिक वाचा
Marathi News from Maharashtra Times, TIL Network