हायलाइट्स:

  • रशिया – युक्रेन संघर्ष शिगेला
  • ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांचा समजावणीचा सूर
  • ‘युद्धाचे परिणाम युरोप, पाश्चिमात्य देशांसह संपूर्ण जगासाठी खूप भयावह असू शकतात’

लंडन, ब्रिटन :

रशिया आणि युक्रेनमधील तणावात दिवसेंदिवस आणखीनच वाढ होताना दिसतेय. अनेक देशांचं लक्ष रशियाच्या हालचालींवर लागून आहे. याच लष्करी आणि राजनैतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी रशियाला इशारा दिलाय.

ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी मंगळवारी एका टीव्ही वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत रशियाला समजावण्याचा प्रयत्न केलाय. रशियाकडून युक्रेनवर हल्ला करण्यात आला तर जगाला दुसऱ्या महायुद्धाहून सामोरं जावं लागू शकतं. याचे परिणाम युरोप, पाश्चिमात्य देशांसह संपूर्ण जगासाठी खूप भयावह असू शकतात, त्यामुळे हे प्रकरण इतक्या पुढे जाऊ नये यासाठी आम्ही पूर्णपणे एकजूट आहोत, असं बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय.

रशियासमोर मी एक गोष्ट स्पष्ट करू इच्छितो की जर रशियाच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनशी युद्ध सुरू करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही रशिया आणि त्याच्या मित्र राष्ट्रांवर आर्थिक निर्बंध लादण्यासहीत त्यांना रोखण्यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलू शकतो. सद्य परिस्थितीत युद्ध सुरू करणं हा अत्यंत आत्मघातकी निर्णय असेल आणि रशियानं हे टाळायला हवं, असंही बोरिस जॉन्सन यांनी म्हटलंय.

Russia-Ukraine Crisis: तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? रशिया – युक्रेन तणावामागची कारणं समजून घ्या…
रशिया विरुद्ध युक्रेन : ‘नाटो’ युक्रेनला पुरवणार लष्करी बळ
काय म्हणाले बोरिस जॉन्सन?

मी युक्रेनला भेट दिलीय आणि मला रशियातील नागरिकांना सांगायचंय की तिथल्या नागरिकांना हा संघर्ष नको असला तरी ते लढायला तयार असतील. रशियन लोकांच्या बाजूने बोलायचं झालं तर युक्रेनवर हल्ला करणाऱ्यांना रक्तरंजित संघर्षाला सामोरे जावं लागेल आणि मला खात्री आहे की रशिया असं कोणतंही काम करणार नाही. युक्रेन नागरिकांना आपल्या देशाचं संरक्षण करण्याचा नैतिक आणि कायदेशीर अधिकार आहे. युक्रेनचे सर्व नागरिक एकजूट होऊन अशा हल्ल्यांना तोंड देतील. या विध्वंसामुळे कुणाचाही फायदा होणार नाही. स्लावो (युरोपमधील एक जमात) नागरिकांनी एकत्र येत उभारलेल्या देशाला संपुष्टात आणण्याचा मानस रशियानं सोडायला हवा, असं आवाहन ब्रिटिश पंतप्रधानांनी केलंय.

Joe Biden: जेव्हा राष्ट्राध्यक्ष पत्रकाराला माईकवर ‘शिवी’ हासडतात…
Boris Johnson: ‘पार्टीगेट’ निवळण्याअगोदरच ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन नव्या वादात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here