राजपथावर सुमारे ९० मिनिटे ही परेड चालली. यामध्ये महिला पुढे येत असल्याचे चित्र सैन्याने दाखवले. नौदल, हवाई दल आणि लष्कराच्या महिला अधिकाऱ्यांनी तिरंग्याला सलामी दिली. लेफ्टनंट मनीषा बोहरा यांनी सर्व पुरुष असेलल्या पथकाचे नेतृत्व केले. यापूर्वी त्यांनी आर्मी डेच्या दिवशीही असेच नेतृत्व केले होते. ऑल मेल आर्मी ऑर्डनन्स रेजिमेंटचे नेतृत्व करणाऱ्या त्या पहिल्या महिला आहेत.
मेगा फ्लायपास्टमध्ये ७५ विमानांचे उड्डाण
परेडमध्ये ७५ विमानांचा मेगा फ्लायपास्ट करण्यात आला. यादरम्यान कॉकपिटमध्ये बसलेल्या पायलटनी त्याचे थेट प्रक्षेपणही केले. राफेल विमानांनीही राजपथावर गर्जना केली आणि ध्रुव हेलिकॉप्टरने आकाशात तिरंगा फडकवला. विनाश फॉर्मेशनमध्ये ५ राफेल लढाऊ विमानांनी उड्डाण केले. प्रथमच ७५ विमानांनी मेगा फ्लायपास्ट केला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे प्रतीक म्हणून निमित्तीने ७५ विमानांनी ही सलामी दिली.
पंतप्रधान मोदींनी विशेष घोड्याला दिला निरोप
परेड संपताच पंतप्रधान मोदींनी राजपथावर उपस्थित नागरिकांना अभिवादन केले. परेडसाठी आलेल्या नागरिकांनीही पंतप्रधान मोदींना अभिवादन केले. राष्ट्रपतींच्या अंगरक्षक दलाचा भाग असलेल्या लोकांचीही भेट यावेळी पंतप्रधान मोदींनी घेतली. बॉडीगार्ड हॉर्स विराटलाही ते भेटले. अंगरक्षक दलातील हा घोडा आज निवृत्त होत आहे. पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विराटला निवृत्तीचा निरोप दिला.

पंतप्रधान मोदी आणि संरक्षण मंत्री ‘विराट’ला निरोप देताना

पंतप्रधान मोदी आणि राजनाथ सिंहांनी ‘विराट’ला दिला निरोप
पंतप्रधान मोदी दिसले खास पोषाखात
पंतप्रधान मोदींनी वॉर मेमोरियलमध्ये शहीदांना श्रद्धांजली वाहिली. यानंतर ते राजपथवर पोहोचले. तिथे त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे स्वागत केले. राष्ट्रगीतानंतर राष्ट्रध्वजाला २१ तोफांची सलामी देण्यात आली आणि 4 Mi-17V5 हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करून परेडला सुरवात झाली. परेडमध्ये भारतीय सैन्याने आपल्या ताकदीची झलक दाखवली. तर विविध राज्यांच्या सांस्कृतिक चित्ररथांनी रंगत वाढवली. यावेळी पंतप्रधान मोदी एका खास पोषाखात दिसले. त्यांनी ब्रह्मकमळ असलेली उत्तराखंडी टोपी घातली होती.
republic day : जवानांच्या शौर्याला सॅल्यूट! ‘हिमवीरां’नी १६ हजार फूट उंचीवर फडकवला तिरंगा
प्रजासत्ताक दिनी दिसले १० मोठे बदल
यावेळी अनेक परंपरा प्रजासत्ताक दिनाच्या उत्सवाचा भाग नव्हत्या. परेड अर्धा तास उशिरा सुरू झाली. सलग दुसऱ्यांदा एकही परदेशी पाहुणा आला नाही. केवळ पूर्ण लसीकरण झालेले लोक परेडमध्ये सहभागी झाले होते. सैन्याच्या तुकड्या ५०, ६० आणि ७० च्या गणवेशात परेड करताना दिसल्या.