हायलाइट्स:

  • ओमिक्रॉन व्हेरियंटवर नवीन लस निर्मितीचा प्रयत्न
  • दोन गटांत पार पडणार चाचणी
  • पी फायझर आणि बायोएनटेक कडून चाचणीला सुरूवात

न्यूयॉर्क, अमेरिका:

करोना विषाणूनं जगाला धडकी भरवली आहे. या विषाणूच्या ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंट तर अनेक देशांत करोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरलाय. अत्यंत वेगानं फैलावणाऱ्या या व्हेरियंटला नियंत्रणात ठेवण्यासाठी विविध आरोग्य यंत्रणा आणि तज्ज्ञ सतत त्यावर उपाय शोधून काढण्याच्या मागे लागलेत. याच दरम्यान अमेरिकन औषध कंपनी ‘फायजर’नं मूळत: कोविड १९ शी लढण्यासाठी तयार केलेली आपली लस आणि ओमिक्रॉन व्हेरियंटसाठी बनवण्यात आलेली नवीन लस यांची चाचणी सुरू केलीय.

पी फायझर आणि बायोएंटेक (भागीदार कंपनी) यांच्याकडून ही माहिती देण्यात आलीय. करोना विषाणू विरुद्ध लढण्यासाठी ‘लस’ निर्माण करणाऱ्या या कंपनीकडून ओमिक्रॉन व्हेरियंटविरुद्ध आपल्या लशीत बदल करण्याचा निर्णय घेतलाय.

एका संशोधनानुसार ज्या व्यक्तींचं लसीकरण पूर्ण झालंय अशा व्यक्तींना ‘डेल्टा’च्या तुलनेत ‘ओमिक्रॉन’ व्हेरियंटच्या संक्रमणाचा धोका अधिक आहे. परंतु, करोनाविरुद्धच्या मूळ लशीत बदल करण्याची आवश्यकता आहे का? हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

Russia – Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यात भारताची भूमिका महत्त्वाची, अमेरिकेला विश्वास
Russia – Ukraine Crisis: ‘युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं तर दुसऱ्या महायुद्धाहून मोठा विध्वंस’, ब्रिटनचा रशियाला इशारा
सध्या उपलब्ध असलेली करोना लस व्यक्तींना करोना आणि मृत्यूच्या धोक्यापासून संरक्षण देण्यास यशस्वी ठरतेय, असं अमेरिकेत झालेल्या एका संशोधनातून समोर आलंय.

तसंच यूएस आणि इतरत्र करण्यात आलेल्या अभ्यासातून असंही समोर आलंय की, बूस्टर डोस संरक्षणात्मक ढाल बनून व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती आणखीन मजबूत करतात. संक्रमणाच्या हलक्या लक्षणांपासून बचावाची शक्यता वाढते.

अमेरिकेत नव्या लशीच्या चाचणीसाठी १८ ते ५५ वर्षांच्या १४२० स्वस्थ व्यक्तींच्या नावाची नोंद केली जातेय. या व्यक्तींवर नव्या लशीचा ‘बूस्टर डोस’च्या स्वरुपात चाचणी करण्यात येणार आहे.

चाचणी दरम्यान पहिल्या गटात तीन ते सहा महिन्यांपूर्वी फायझरच्या मूळ लशीचे दोन डोस देण्यात आले होते अशा जवळपास ६०० व्यक्तींना एक किंवा दोन ‘ओमिक्रॉन’ विरुद्ध लशीचे बूस्टर डोस दिले जातील. तर दुसऱ्या गटात अशा ६०० व्यक्तींचा समावेश आहे ज्यांना अगोदरपासूनच तीन रेग्युलर डोस देण्यात आले आहे. अशा व्यक्तींना चौथा डोस म्हणून कोविड लस किंवा नवीन ओमिक्रॉनविरुद्धची लस देण्यात येईल.

या चाचणीत आतापर्यंत लस न घेणाऱ्या काही व्यक्तींचाही समावेश असेल. अशा व्यक्तींना ओमिक्रॉन लशीचे तीन डोस देण्यात येतील.

US Travel Advisory: भारतात बलात्काराच्या घटना, दहशतवादात वाढ; अमेरिकेकडून नागरिकांना सूचना
Pakistan: पाकिस्तानात कट्टरपंथियांकडून हिंगलाज मंदिरावर हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here