हायलाइट्स:
- मोटारसायकल आणि चारचाकी गाडीची समोरासमोर धडक
- तरुण जागीच ठार
- ६ जण जखमी, उपचार सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, शहादा-लोणखेडा बायपासवर रस्त्यालगत असलेल्या पाटीदार मंगल कार्यालयासमोर हा अपघात झाला. कळंबू येथील दोघे म्हसावद येथे लग्नासाठी जात असताना मोटारसायकलची (क्र. एम.एच. ३९, पी. ८५५४) आणि बोलेरो गाडीची (क्र. एम.एच.३९, जे.३७९०) समोरासमोर धडक झाली.
या अपघातात दुचाकीस्वार अजय सुभाष मोरे (२५, रा. कळंबू, ता. शहादा) याचा जागीच मृत्यू झाला, तर सागर सोमा सोनवणे (रा. कळंबू ता. शहादा) यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर बोलेरे गाडी तीन वेळा पलटल्याने गाडीतील ५ जण जखमी झाले आहेत. या जखमींना ग्रामीण रुग्णालय म्हसावद येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले.
दरम्यान, या दुर्घटनेची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास करण्यात येत आहे.