ठाणे : विटभट्टीवर लागणारा कोळसा कंटेनर (ट्रक) मधून खाली करत असतांना ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकऑप्सर अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेला कंटेनर वीटभट्टी मजुराच्या गवताच्या घरावर कोसळला. संपूर्ण कोळसा घरावर पडल्याने घरात राहणारी सर्व सदस्य गाडले गेले. घटनेची माहिती तात्काळ स्थानिकांना लागताच स्थानिकांनी तात्काळ कोळश्याच्या ढिगा-याखालून सर्वांना बाहेर काढले. मात्र, या दुर्घटनेत तीन मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

भिवंडी तालुक्यातील टेंभिवली गावात राहणाऱ्या बालाराम वळवी हे कुटुंबियांसह आपल्या घरात झोपले असताना ट्रकच्या ट्रोलीतील वीट भट्टीसाठी लागणारा कोळसा त्यांच्या घरावर पडून घरातील सर्व सदस्य या कोळश्याच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेले. त्यांच्या घराजवळ असलेल्या विट भट्टीसाठी लागणारा कोळसा ट्रकने आणला होता आणि तो खाली करत असताना ट्रकच्या ट्रॉलीचा शॉकऑप्सर अचानक तुटल्याने कोळश्याने भरलेल्या कंटेनरमधील कोळसा त्यांच्या घरावर पडून ही दुर्घटना घडली.

‘कायद्याचं राज्य आहे आयुक्त म्हणतील तसं चालणार नाही, भर कार्यक्रमात जितेंद्र आव्हाडांनी आयुक्तांना झापलं
बाळाराम वळवी हे आपली पत्नी एक लहान मुलगा आणि तीन मुलींसोबत या ठिकाणी राहत होते. त्यामुळे याआधी देखील वळवी यांनी अनेक वेळा या विटभट्टीसाठी कोळसा घराजवळ उतरवण्यास विरोध केला होता. मात्र कोळसा घराशेजारीच उतरवला जात होता. ही दुर्घटना घडली त्यावेळी वळवी त्यांची पत्नी आणि लहान मुलाला यांना बाहेर काढण्यात स्थानिकांना यश आलं. परंतु, इतर तीन मुली कोळसाच्या ढिगाऱ्याखाली गाडल्या गेल्याने बाहेर काढल्यानंतर त्यांची प्रकृती गंभीर होती.

पुढील उपचाराकरता मुलींना भिवंडीतील उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या दुर्घटनेमध्ये वळवी यांची तिन्ही मुलींचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात हळहळ व्यक्त होत आहे . तर दुसरीकडे संतप्त जमावाने कंटेनर (ट्रकची) ची तोडफोड केली आहे. सध्या भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात यासंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तर वीटभट्टी मालक, ट्रक मालक त्यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

‘ते’ ७ जण ७ कोटी रुपये किंमतीच्या २ हजाराच्या बनावट नोटा घेऊन जात होते; पोलिसांनी सापळा रचून पकडले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here