नवी दिल्ली (Petrol Price Today) : IOCL ने गुरुवारी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले आहेत. देशाची राजधानी दिल्लीत बुधवारी पेट्रोल ९५.४१ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. आजच्या किमतींचा विचार केला तर प्रजासत्ताक दिनाच्या दुसऱ्या दिवशीही इंधनाच्या दरांमध्ये काहीही बदल झाल्याचं पाहायला मिळत नाही.

खरंतर, ४ नोव्हेंबर २०२१ पासून वाहनांच्या इंधनाच्या किमतीत कोणताही बदल झालेला नाही. या दिवशी केंद्राने पेट्रोलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty Cut) ५ रुपयांनी आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क १० रुपयांनी कमी केले. त्यानंतर अनेक शहरांमध्ये पेट्रोल १०० रुपयांपर्यंत खाली आलं.

Budget 2022 वेध अर्थसंकल्पाचे; सीतारामन यांच्याकडून गुंतवणूकदारांची ही आहे अपेक्षा

देशातील प्रमुख शहरांमध्ये आणि ४ महानगर शहरांमध्ये काय आहे आजचा भाव?

– दिल्ली पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लीटर
– मुंबई पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लीटर
– चेन्नई पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लीटर
– कोलकाता पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लीटर
– गांधीनगर पेट्रोल ९५.३५ रुपये आणि डिझेल ८९.३३ रुपये प्रति लीटर
– लखनौ पेट्रोल ९५.२८ रुपये आणि डिझेल ८६.८० रुपये प्रति लीटर

दररोज ६ वाजता बदलतात किंमती

पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.

coronavirus update करोना: राज्यात आज ३९ हजारांवर रुग्ण झाले बरे; ३५ हजारांवर नवे रुग्ण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here