वर्धा : सेलसुरा येथे झालेल्या अपघातात सात वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अपघातात निधन झालं होतं. यात तिरोडा – गोरेगाव मतदारसंघातील भाजपा आमदार विजय रहांगडाले यांचा मुलगा अविष्कार याचंही निधन झालं होतं. मंगळवारी अविष्कारवर गोंदिया जिल्ह्याच्या खमारी या मुळगावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून पोलीस तपास सुरू असल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलाच्या निधनानंतर आमदार विजय रहांगडाले यांनी फेसबुकवर कविता शेअर करत आपलं दुःख व्यक्त केलं आहे. अविष्कार हा आमदार विजय रहांगडाले यांचा एकुलता मुलगा होता. या घटनेनंतर या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सोशल मीडियावर मुलाला ‘आज काळीज फाटलं, त्यानं आकाश गाठलं’ या कवितेच्या माध्यमातून श्रद्धांजली दिली आहे.

ठाणे हादरलं! मजुराच्या डोळ्यासमोर ३ मुलींचा दुर्दैवी अंत, वीटभट्टीवरील भीषण अपघातामुळे खळबळ
आमदारांची भावनिक पोस्ट

काय झालं होतं नेमकं?देवळी येथून वर्धाला येत असताना सेलसुरा जवळ हा अपघात झाला. वाहनावर नियंत्रण सुटल्यामुळे जवळील नदीच्या पुलावरून वाहने थेट खाली पडलं. जवळपास ४० फूट लांब व रुंद चारचाकी वाहन खाली पडल्याने भीषण अपघात झाला. गंभीर म्हणजे मृतांमध्ये सर्वच जवळपास २५ ते ३५ वयोगटातील आहेत. रात्री एक वाजताच्या जवळपास हा अपघात झाला. चार वाजेपर्यंत मृत्यूदेह बाहेर काढण्याचं काम सुरू होतं.
Weather Alert : पुढचे २ दिवस धोक्याचे; महाराष्ट्रासह ‘या’ जिल्ह्यांमध्ये थंडीचा तडाखा आणि पावसाची शक्यता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here