अजित पवार यांची १०५५ कोटींची संपत्ती बेनामी घोषित झाली आणि जप्त झाली. आता पुढे काय होते ते पाहा. अजित पवार यांचा मुलगा जय पवार याने काय कारनाम केलेत, तेदेखील लवकरच बाहेर येतील.

अजित पवार किरीट सोमय्या

अजित पवार यांचा मुलगा जय पवार याने काय कारनाम केलेत, तेदेखील लवकरच बाहेर येतील.

हायलाइट्स:

  • यापूर्वी किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांच्यावर आरोप केले होते
  • सर्व नियमांचे उल्लंघन करून पवार यांनी स्वत:च हा कारखाना स्वत:ला विकल्याचा आरोप सोमय्या यांनी म्हटले होते

मुंबई : मंत्रालयातील नगरविकास खात्याच्या कार्यालयात जाऊन फाईल्स पाहिल्यामुळे वादात सापडलेले भाजप नेते किरीट सोमय्या आता ठाकरे सरकारवर आणखी एक बॉम्ब टाकण्याची शक्यता आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा मुलगा जय पवार किरीट सोमय्या यांच्या रडारवर असल्याचे समजते. जय पवार यांचे कारनामे मी लवकरच उघड करणार असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला. (DCM अजित पवार | मुलगा जय पवार रडारवर भाजप नेता किरीट सोमय्या)
सरकारी कार्यालय कोणाच्या बापाच्या मालकीचं नसतं; सोमय्यांना नोटीस पाठवल्याने फडणवीस संतापले
किरीट सोमय्या यांनी यासंदर्भात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, अजित पवार यांची १०५५ कोटींची संपत्ती बेनामी घोषित झाली आणि जप्त झाली. आता पुढे काय होते ते पाहा. अजित पवार यांचा मुलगा जय पवार याने काय कारनाम केलेत, तेदेखील लवकरच बाहेर येतील, असे वक्तव्य किरीट सोमय्या यांनी केले. त्यामुळे किरीट सोमय्या आता कोणता नवा गौप्यस्फोट करणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
किरीट सोमय्या म्हणजे भाजपची ‘आयटम गर्ल’; नवाब मलिकांची शेलक्या शब्दांत टीका
काही दिवसांपूर्वीच किरीट सोमय्या यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्यातील घोटाळ्यासंदर्भात अजित पवार यांच्यावर आरोप केले होते. बेनामी गुंतवणूक करून, कंपन्यांचे जाळे निर्माण करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची खरेदी केली. सर्व नियमांचे उल्लंघन करून पवार यांनी स्वत:च हा कारखाना स्वत:ला विकला, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले होते. किरीट सोमय्यांच्या आरोपाला अजित पवार यांनीही तोडीस तोड प्रत्युत्तर दिले होते. कोणी काही आरोप करत असले तरी त्याच्याकडं पुरावा मागितला जाईल. नुसत्या बिनबुडाच्या आरोपाला अर्थ नसतो. कुठल्याही गोष्टीची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा आहेत, त्यांना चौकशीचे अधिकार आहेत. त्या चौकशी करतीलच, दुसरं कुणी करणार आहे का, असा सवाल अजित पवार यांनी सोमय्यांना विचारला होता.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: भाजप नेते किरीट सोमय्या यांचा डीसीएम अजित पवार पुत्र जय पवार यांच्यावर आरोप
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here