हायलाइट्स:

  • सोमवारी चीनकडून हायपरसॉनिक इंजिनची चाचणी
  • इंजिननं सर्व मापदंड पूर्ण केल्याचा दावा
  • चाचणी उड्डाणात दोन-स्टेज रॉकेट बूस्टरचा वापर

बीजिंग, चीन :

चीनकडून सोमवारी नवीन हायपरसॉनिक इंजिनची चाचणी घेतली. चाचणी उड्डाणा दरम्यान इंजिननं सर्व मापदंड पूर्ण केल्याचा दावा केला जातोय.

या इंजिनच्या माध्यमातून चीनकडे ‘डीएफ १७‘ सारखं आणखी एक हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बनवण्याची शक्ती निर्माण होऊ शकते. ११ मीटर लांबीचं डीएफ-१७ क्षेपणास्त्र १८०० किमी ते २५०० किमीपर्यंत मारा करण्यास सक्षम आहे.

भविष्यात नवीन हायपरसॉनिक इंजिनच्या मदतीनं चीन हायपरसॉनिक विमान आणि पृथ्वीच्या निम्न कक्षेत जाणारं विमानही बनवू शकतं. चीनकडून नवीन हायपरसॉनिक क्षेपणास्त्र बनवल्यानं भारत, अमेरिकेसहीत संपूर्ण जगाला धोक्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

Russia Ukraine Crisis: भारत दौऱ्यावर एक ‘चूक’… आणि जर्मन नौदल प्रमुखांवर राजीनाम्याची वेळ!
Russia – Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यात भारताची भूमिका महत्त्वाची, अमेरिकेला विश्वास
Russia – Ukraine Crisis: ‘युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं तर दुसऱ्या महायुद्धाहून मोठा विध्वंस’, ब्रिटनचा रशियाला इशारा
दोन स्टेज ‘रॉकेट बूस्टर‘चा वापर

चायना सेंट्रल टेलिव्हिजन (CCTV) नं दिलेल्या वृत्तानुसार, हे हायपरसॉनिक इंजिन सिंघुआ विद्यापीठातील ‘स्कूल ऑफ एरोस्पेस इंजिनिअरिंग’ अंतर्गत येणाऱ्या ‘स्प्रे कम्बश्चन अँड प्रपल्शन’ प्रयोगशाळेनं विकसित केलंय. या इंजिननं सोमवारी पहिली उड्डाण चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. चाचणी उड्डाणात दोन-स्टेज रॉकेट बूस्टरचा वापर करण्यात आला. उड्डाणाच्या दुसऱ्या टप्प्यात इंजिन पूर्वनिर्धारित उंची आणि वेग गाठण्यात यशस्वी ठरलं. यादरम्यान, इंजिनचं एअर इनलेट कार्यरत झालं आणि स्प्रे तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इंजिनच्या ज्वलन कक्षाला जेट इंधनाचा पुरवठा सुरू झाला.

चाचणी उड्डाणा दरम्यान दुसऱ्या टप्प्यातील रॉकेट बूस्टर हायपरसॉनिक इंजिनपासून वेगळं झालं नाही. यात बसवलेल्या पॅराशूटच्या मदतीनं हायपरसॉनिक इंजिनला एका वाळवंटी भागात सुरक्षितपणे उतरवण्यात आलं. यामुळे हायपरसॉनिक इंजिनचा पुन्हा वापर करता येणं शक्य आहे, असं अहवालात नमूद करण्यात आलंय.

संबंधित चाचणी उड्डाणातून हायपरसॉनिक इंजिनच्या विकासाशी संबंधित अनेक महत्त्वपूर्ण माहिती हाती लागल्याचं शास्त्रज्ञांनी म्हटलंय. ही माहिती हायपरसॉनिक इंजिनचा ज्वलन कक्ष अधिक प्रभावी बनविण्यात मदत करेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केलीय.

India Pakistan: ‘भारताकडून स्थानिक गुंडांना पैसे’; पाकिस्तान गृहमंत्र्यांची वाचाळ बडबड
Omicron Variant : या औषध कंपनीकडून ‘ओमिक्रॉन’विरुद्ध लशीची चाचणी सुरू
US Travel Advisory: भारतात बलात्काराच्या घटना, दहशतवादात वाढ; अमेरिकेकडून नागरिकांना सूचना

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here