मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय हिच्या लग्नाची चर्चा सुरू होती. अखेर आज बॉयफ्रेंड सूरज नांबियार याच्याशी लग्नबंधनात अडकली. या विवाहसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. मौनी आणि सूरजचा विवाहसोहळा गोव्यात पार पडला. दोघांचे कुटुंबिय आणि जवळची मित्र मंडळी यांनी लग्नाला उपस्थिती लावली. तसंच टीव्हीवरील अनेक कलाकारांनी या मौनीच्या लग्नाला हजेरी लावली होती. मौनीचा नवरा सूरज आहे तरी कोण असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.

मौनीचा नवरा सूरज नांबियारचा जन्म कर्नाटकमधील बेंगळुरूत जैन कुटुंबात झाला. त्याचं प्राथमिक शिक्षण जैन इंटरनॅशनल शाळेत झालं असून २००८ मध्ये त्यानं बेंगळुरूच्या आरव्ही इंजिनीअरिंग कॉलेजमधून सिव्हिल इंजिनीरिंग पूर्ण केलं. सूरज हा दुबईत राहणारा भारतीय व्यापारी आणि बँकर आहे. तर मौनीनं मास कम्युनिकेशनचं शिक्षण घेतलं आहे. पण अभिनयात करिअर करण्यासाठी तिनं शिक्षण अर्धवट सोडलं.

मौनी रॉय

२००७मध्ये मौनीला तिच्या अभिनयाच्या क्षेत्रातील पहिली संधी मिळाली होती. एकता कपूरच्या गाजलेल्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेत मौनी पहिल्यांदा झळकली होती. त्यानंतर २०१८मध्ये पहिल्यांदा बॉलिवूड चित्रपटात दिसली. टीव्ही जाहिराती, टीव्ही मालिका आणि सोशल मीडियावरील प्रमोशन , चित्रपट याद्वारे मौनी रायची मोठी कमाई होत आहे. तर सूरज बँकर असल्यानं त्याच्या एकूण संपत्तीचा आणि कमाईचा आकडाही मोठा आहे.

मौनी रॉय

मौनी रॉय वर्षभरात १-२ कोटींची कमाई करत असून तिची एकूण संपत्ती १० कोटींहून अधिक असल्याचं समजतं. तर सूरजची एकूण संपत्ती ५० कोटींहून अधिक असल्याचं म्हटलं जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here