हायलाइट्स:

  • अटकेतील विद्यार्थ्यांना संबोधलं ‘दिल्ली १८’
  • ‘विद्यार्थ्यांना अन्यायकारकरित्या आरोपी बनवण्यात आलं’
  • अनेक देशांतील भारतीय, परदेशी नागरिक आणि नेत्यांचा पाठिंबा

न्यूयॉर्क, अमेरिका:

भारतातील ‘नागरिकत्व दुरुस्ती कायद्या’च्या (CAA) निषेध नोंदवणाऱ्या १८ आरोपींच्या सुटकेची आंतरराष्ट्रीय स्तरावर मागणी आलीय. अमेरिकेसहीत इतर काही देशांतून या आरोपींच्या अटकेविरुद्ध आवाज उचलला गेलाय. या मागणीला अनेक देशांतील भारतीय, परदेशी नागरिक आणि नेत्यांनी पाठिंबा दिला आहे. भारतात नागरिकत्व दुरुस्ती कायद्या विरोधात लोकशाही पद्धतीनं आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य केलं जात असल्याचा दावा त्यांनी केलाय.

१८ आरोपी विद्यार्थ्यांना ‘दिल्ली १८’ असं नाव देण्यात आलंय. ‘दिल्ली १८’च्या यादीत उमर खालिद, शर्जील इमाम, सफूरा जरगर यांसहीत इशरत जहाँ, खालिद सैफी, ताहिर हुसैन, सलीम मलिक, मोहम्मद सलीम खान, मीरान हैदर, शादाब अहमद, गुलफिशा फातिमा, तस्लीम अहमद, शिफा उर रहमान, अतहर खान, मोहम्मद फैजान खान, आसिफ इक्बाल तन्हा, नताशा नरवाल आणि देवांगना कलिता यांचा समावेश आहे. यात १३ मुस्ली विद्यार्थ्यांचा समावेश असून गेल्या वर्षभरापासून ते तुरुंगात आहेत.

जगातील वेगवेगळ्या भागांतून या मागणीसाठी एकत्र आलेल्या व्यक्तींकडून भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्तं एक निवेदन जाहीर करण्यात आलंय.

ज्या १८ विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवर आरोप ठेवण्यात आले आहेत, त्यांच्यावर दाखल झालेले सर्व खटले मागे घेण्यात यावेत, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आलीय.

Hypersonic Engine: चीनकडून जगाला इशारा! नव्या हायपरसॉनिक इंजिनची चाचणी
Omicron Variant : या औषध कंपनीकडून ‘ओमिक्रॉन’विरुद्ध लशीची चाचणी सुरू
ऑस्ट्रेलियन खासदार आणि हिंदू संघटनांचाही समावेश

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगभरातील नेते आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांसह मी १८ धाडसी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांवरील आरोपांविरोधात आवाज उंचावत आहे. भारत सरकार त्यांना चुकीच्या पद्धतीनं दहशतवादी ठरवत आहे, असं ऑस्ट्रेलियाचे खासदार डेव्हिड शूब्रिज यांनी म्हटलंय.

तर ‘अॅम्नेस्टी इंटरनॅशनल’चे ‘इंडिया कंट्री स्पेशलिस्ट’ गोविंद आचार्य यांनी विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांच्या अटकेला ‘अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आघात’ असं म्हटलंय. तसंच या विद्यार्थ्यांची तत्काळ सुटका करण्याची मागणी त्यांनी केलीय.

या देशातील व्यक्ती आणि संघटनांचा सहभाग

ही मागणी करणाऱ्यांत दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, यूएसए, यूके, जर्मनी, नेदरलँड आणि न्यूझीलंडमध्ये राहणाऱ्या भारतीयांचाही समावेश आहे. त्यांनी ‘दिल्ली १८ विद्यार्थ्यांना अन्यायकारकरित्या आरोपी बनवण्यात आल्याचा’ निषेध केला आहे.

निवेदनावर स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये हिंदूज फॉर ह्युमन राइट्स’ (यूएसए), इंटरनॅशनल कौन्सिल ऑफ इंडियन मुस्लीम, वर्ल्डवाइड, दलित सॉलिडॅरिटी फोरम’ (यूएसए) इत्यादी संघटनांशी संबंधित व्यक्तींचा समावेश आहे.

Russia Ukraine Crisis: भारत दौऱ्यावर एक ‘चूक’… आणि जर्मन नौदल प्रमुखांवर राजीनाम्याची वेळ!
Russia – Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यात भारताची भूमिका महत्त्वाची, अमेरिकेला विश्वास

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here