नवी दिल्ली: भारतीय क्रिकेटपटू क्रुणाल पंड्याच्या ट्विटर अकाउंटवरून गुरुवारी सकाळी काही ट्वीट करण्यात आले. विचित्र ट्वीट पाहून लोकांना देखील धक्का बसला. काहींनी त्याला ट्रोल करण्यास सुरूवात केली. तर काहींनी याचा संबंध दीपक हुड्डाशी झालेल्या वादाशी जोडून मजा घेण्यास सुरूवात केली.

वाचा-तो फोन जवळ ठेवत नाही आणि माझ्याकडे त्याचा नंबर देखील नाही, भारतीय खेळाडूबद्दल झाला मोठा..

२०२१ मध्ये कृणाल पंड्या आणी दीपक हुडा यांच्यातील वाद चर्चेत आला होता. एक दिवसापूर्वी म्हणजे बुधवारी रात्री दीपकचा वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी भारतीय संघात समावेश करण्यात आला. तर क्रुणाल आणि त्याचा भाऊ हार्दिक या दोघांची निवड झाली नाही. त्यानंतर क्रुणालचे अकाउंट हॅक झाले आणि सोशल मीडियावर युझर्सनी त्याला ट्रोल करण्यास सुरुवात केली.

वाचा- पंड्याने ज्याला करिअर संपवण्याची धमकी दिली होती, त्याची रोहितच्या संघात निवड

क्रुणाल पंड्याच्या ट्विटर अकाउंटवरून असे काही ट्वीट केले गेले जे आम्ही इथे शेअर करू शकत नाही. खराब फॉर्ममुळे क्रुणाल आणि हार्दिक यांना संघाबाहेर ठेवण्यात आले आहे. पाहा सोशल मीडियावरील प्रतिक्रिया…

वाचा- BCCIचे डोळे उघडले; दक्षिण आफ्रिका दौऱ्यात पाहा काय झाले होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here