हायलाइट्स:

  • रशिया विरुद्ध युक्रेन तणाव
  • अमेरिकेकडून युक्रेनला मदत
  • जेव्हलिन मिसाईल आणि स्टिंगर मिसाईल युक्रेनला रवाना

वॉशिंग्टन, यूएसए:

युक्रेन आणि रशिया या दोन राष्ट्रांतील वाद आता युद्धाच्या उंबरठ्यावर जाऊन ठेपलाय. याच दरम्यान, अमेरिकेकडून शेकडो भाला क्षेपणास्त्र आणि स्टिंगर क्षेपणास्त्र युक्रेनला धाडल्यात. उल्लेखनीय म्हणजे, अमेरिकेनं धाडलेल्या या प्रत्येक हत्यारावर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचं नाव कोरण्यात आलंय. युद्धाच्या विचारांतून मागे हटण्यासाठी रशियावर दबाव निर्माण करण्याचा हा अमेरिकेचा एक प्रयत्न असल्याचं दिसून येतंय.

या अगोदर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी रशियासहीत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्यावर वैयक्तिक निर्बंध लादण्याची धमकी दिली होती. त्यानंतर, अमेरिकेनं युक्रेनला मदत म्हणून ही क्षेपणास्त्र पाठवली आहेत.

रशियानं युक्रेनवर हल्ला केला तर त्यांना याचे परिणाम भोगावे लागतील, असा इशाराही बायडेन यांनी दिला आहे.

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या फोटोंमध्ये, अमेरिकन सैनिक बायडेन यांच्या गृह राज्य असलेल्या डेलावर मधून युक्रेनला क्षेपणास्त्र रवाना करताना दिसत आहेत. याआधीही अमेरिकेनं युक्रेनला ६० कोटी डॉलर किंमतीची शस्त्रास्त्र पुरविली आहेत.

रशियाला सडेतोड उत्तर देण्यासाठी अमेरिका युक्रेनला हवाई संरक्षण यंत्रणाही उपलब्ध करून देणार आहे. या संकटाच्या काळात अमेरिका युक्रेनच्या खांद्याला खांदा लावून उभी असल्याची घोषणा बायडेन यांच्याकडून करण्यात आलीय.

यामुळे, अमेरिका आणि रशिया या दोन जागतिक महासत्ता एकमेकांसमोर उभ्या ठाकल्याचं चित्र निर्माण झालंय.

अमेरिका युक्रेन रशिया

अमेरिकेनं युक्रेनला धाडलेल्या प्रत्येक मिसाईलवर कोरलं ‘पुतीन’ यांचं नाव!

Hypersonic Engine: चीनकडून जगाला इशारा! नव्या हायपरसॉनिक इंजिनची चाचणी
Russia – Ukraine Crisis: ‘युक्रेनमध्ये युद्ध सुरू झालं तर दुसऱ्या महायुद्धाहून मोठा विध्वंस’, ब्रिटनचा रशियाला इशारा
युक्रेनला ३०० अँटी-टँक जेव्हलिन क्षेपणास्त्रं

रशिया आणि युक्रेनमधील युद्धाचा वाढता धोका लक्षात घेऊन अमेरिका अॅक्शनमध्ये आलीय. अमेरिकेनं मंगळवारी युक्रेनला ३०० अँटी-टँक जेव्हलिन क्षेपणास्त्रं पाठवली. ही क्षेपणास्त्रे ‘मॅन-पोर्टेबल’ आहेत म्हणजेच सैनिक खांद्यावर घेऊन ही क्षेपणास्त्र डागू शकतात.

जेव्हलिन क्षेपणास्त्रांचा वापर आर्मर्ड वाहने, टँक आणि बंकर नष्ट करण्यासाठी केला जाऊ शकतो. युद्धाच्या परिस्थितीत ही क्षेपणास्त्रं रशियन सैन्यासाठी धोकादायक ठरू शकतात.

दुसरीकडे, रशियानंही आपल्या रणगाड्यांवर ‘एक्सप्लोझिव्ह रिअॅक्टिव्ह आर्मर’ बसवले आहे, जे शत्रूकडून डागण्यात आलेली क्षेपणास्त्रे उधळून लावू शकतात.

Russia Ukraine Crisis: भारत दौऱ्यावर एक ‘चूक’… आणि जर्मन नौदल प्रमुखांवर राजीनाम्याची वेळ!
Russia – Ukraine Crisis: रशिया-युक्रेन युद्ध रोखण्यात भारताची भूमिका महत्त्वाची, अमेरिकेला विश्वास
अमेरिकन दूतावासानं दिली माहिती

युक्रेनमधील अमेरिकन दूतावासानं ट्विट करून यासंदर्भात अधिक माहिती दिलीय. अध्यक्ष जो बायडेन यांच्याकडून मंजूर करण्यात आलेली २०० मिलियन डॉलरची तिसरी खेप आज रात्री कीव इथं दाखल झाल्याचं, यूएस दूतावासानं ट्वीट केलंय.

‘आम्ही युक्रेनला शक्य ती सर्व मदत करू. तिसर्‍या खेपेत ३०० जेव्हलिन क्षेपणास्त्रांसह ७० टन लष्करी सहाय्य सामग्रीचा समावेश आहे. या ३०० जेव्हलिन क्षेपणास्त्रांची किंमत ५० मिलियन डॉलर असल्याचं सांगितलं जातंय. शिपमेंटमध्ये ग्रेनेड लॉन्चर, तसंच दारूगोळा आणि इतर शस्त्रांस्त्रांचा समावेश आहे. अनेक युरोपीय देशांनीही युक्रेनला यापूर्वीच मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा पुरवला आहे.

Russia-Ukraine Crisis: तिसऱ्या महायुद्धाची चाहूल? रशिया – युक्रेन तणावामागची कारणं समजून घ्या…
CAA: ‘उमर खालिद, शरजील आणि सफुराची कैदेतून सुटका करा’, विदेशातूनही उठला आवाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here