हायलाइट्स:
- अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
- यावल तालुक्यातील संतापजनक घटना
- आरोपी तरुणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
पीडित अल्पवयीन मुलगी शौचास गेली होती. यावेळी दोन तरुणांनी पीडित मुलीला जबरदस्तीने केळीच्या बागेत नेले आणि तिथं तिच्यावर आळीपाळीने अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर दोन्ही नराधमांनी पीडित मुलीला याबाबत कोणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली. घाबरलेल्या मुलीने ही माहिती कुटुंबियांना सांगितल्यानतंर त्यांनी पोलिसात धाव घेतली.
दोघे संशयित ताब्यात
पीडित मुलीच्या फिर्यादीवरुन याच गावातील दोन अल्पवयीन तरुणांवर बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून संरक्षण कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिता कोळपकर या करत आहेत. दोन्ही संशयितांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.
दरम्यान, अल्पवयीने आरोपींच्या या कृत्याने परिसरात खळबळ उडाली असून संताप व्यक्त केला जात आहे.