हायलाइट्स:
- मुंबईत टिपू सुलतान नावावरून वाद पेटला
- भाजप-शिवसेना आमनेसामने
- महापौर किशोरी पेडणेकर यांनी भाजपला दिले थेट आव्हान
- भाजप मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत असल्याचा आरोप
मालाडच्या क्रीडा संकुलाला टिपू सुलतान यांचं नाव देण्याच्या मुद्द्यावरून वाद पेटला आहे. भाजपने शिवसेनेवर आरोप केल्यानंतर आता शिवसेनेकडूनही प्रत्यारोप करण्यात येत आहेत. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. भाजप मुंबईची कायदा आणि सुव्यवस्था बिघडवत आहे, असा आरोप त्यांनी केला आहे. भाजपचे आमदार हे दंगल घडेल, असा इशारा देत आहेत. दंगड घडवून दाखवा, असे आव्हानच पेडणेकर यांनी दिले. कुणाला दंगल हवी आहे? कुणाला मुंबईची शांतता बिघडवायची आहे, असा सवालही त्यांनी भाजपला केला. मुंबईच्या नागरिकांना अस्थिर करू नका, करायचेच असेल तर या मैदानात, असे थेट आव्हानच त्यांनी भाजपला दिले.
२००१ आणि २०१५ मध्ये मुंबईत दोन रस्त्यांना टिपू सुलतानचे नाव दिले होते. त्यावेळी भाजपने का विरोध केला नाही, असा सवालही त्यांनी विचारला. मालाडच्या मैदानाला झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचे नाव द्या, अशी मागणी शिवसेनेने केली आहे. भाजपने याबाबतची माहिती घ्यावी, असेही त्या म्हणाल्या.
>> टिपू सुलतान नामकरणाचा ठराव मुंबई महानगरपालिकेने मंजूर केला आहे काय? नसल्यास हे नामकरण अधिकृत आहे काय?
>> महाराष्ट्र शासनाच्या जागेवरील मालाड येथील उद्यानास नामकरणाचा ठराव महाराष्ट्र राज्य शासनाने मंजूर केला आहे काय? असल्यास ठरावाची प्रत दाखवावी?
>> कुठेही नामकरणाचा ठराव मंजूर झाला नाही. अशावेळी अनधिकृत नामकरणाला मुंबईच्या अधिकृत महापौरांचा पाठिंबा आहे काय?
>> यापूर्वी मुंबई शहरात दोन रस्त्यांना ‘टिपू सुलतान’ असे नाव देण्यात आले आहे. त्या सभावृत्तांतात खाडाखोड, पेनने नाव लिहिणे व सहीमध्ये खाडाखोड याचा अर्थ काय?
>> आपल्याकडे तत्कालीन नगरसेवक अमित साटम यांचे अनुमोदनाचे पत्र आहे काय? मग त्यांचे अनुमोदन कुठल्या आधारावर घेतलेत?
>> २२ जुलै २०२१ रोजी भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी मांडलेली ठरावाची सूचना १)“एम / पूर्व विभागातील बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरु होऊन रफिनगर नाल्यापर्यंत जाणाऱ्या शिवाजीनगर मार्ग क्र.४ ह्यास ‘शहीद टिपु सुलतान मार्ग’ असे नाव देण्याबाबत, महापालिकेने आपला २७ डिसेंबर २०१३ चा ठराव क्र. १२९० अन्वये घेतलेल्या निर्णयाचा, महापालिका, ह्याद्वारे, फेरविचार करीत आहे.
२) अंधेरी (प) येथील भवन्स महाविद्यालयापासून सुरु होऊन गिल्बर्ट हिल मार्गे सी.डी. बर्फिवाला मार्गाच्या नाक्यापर्यंत जाणाऱ्या रस्त्यास ‘शेर-ए- हैसूर टिपु सुलतान मार्ग’ असे नाव देण्याबाबत, महापालिकेने आपला २३ एप्रिल २००१ चा ठराव क्र. ५२ अन्वये घेतलेल्या निर्णयाचा, महापालिका, ह्याद्वारे, फेरविचार करीत आहे. या ठरावाच्या सूचना विचारार्थ का घेण्यात आल्या नाहीत?