मुंबई: करोना व्हायरसची साथ वेगानं पसरत असून महाराष्ट्रात करोनाग्रस्तांचा आकडा ३२० वर पोहोचला आहे. तर, या आजारामुळं आतापर्यंत १२ जणांचे मृत्यू झाले आहेत. सर्व प्रकारची खबरदारी घेऊनही साथ वाढत असल्यानं प्रशासनासह नागरिकांच्या चिंतेतही भर पडली आहे. जाणून घेऊन याबाबतच्या ताज्या घडामोडी…

लाइव्ह अपडेट्स:

>> अहमदनगर: करोनाग्रस्तांच्या उपचारासासाठी इंदोरीकर महाराजांकडून एक लाखांची मदत

>> पुण्यात दोन ज्येष्ठ नागरिकांना करोनाची लागण… पुणे शहरातील रुग्णांची संख्या ३१ तर, जिल्ह्याचा आकडा ५० वर

>> पिंपरी-चिंचवड: दिल्लीतून आलेले १४ लोक रुग्णालयात दाखल. १८ जणांचा शोध सुरू

>> राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे पोहोचले मुंबई महापालिका मुख्यालयात

>> बुलडाण्यात अजून आठ चाचण्यांच्या अहवालाची प्रतीक्षा, जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. प्रेमचंद पंडित यांची माहिती

>> बुलडाण्यात २३ वर्षांच्या तरुणाची करोना चाचणी पॉझिटिव्ह; एकूण रुग्णांची संख्या ४ वर. त्यापैकी एकाचा मृत्यू

वाचा:

>> नागपूर मोमिनपुरा येथील जामा मशीद येथे निर्जंतुकीकरण

>> नागपुरात शेतकऱ्यांद्वारे थेट भाजी विक्रीला सुरुवात… हनुमान नगर झोनमधील रेशीमबाग मैदानावर आजपासून विक्री, पण ‘सोशल डिस्टन्सिंग’चा फज्जा

>> घरात क्वारंटाइन असलेल्या व्यक्तींनी काय व कशी काळजी घ्यावी?; शरद पवारांनी केलं सरकारी माहितीचं ट्विट

>> पुण्यातून जवळपास १३० लोक मरकजमध्ये सहभागी झाल्याची माहिती; यापैकी बहुतेक लोक लपून बसले असण्याची शक्यता

>> पुणे: निजामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या अन्य लोकांचा शोध सुरू, जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची माहिती

>> दिल्लीतील निझामुद्दीन मरकजमध्ये सहभागी झालेल्या पुण्याचे ६० लोक ‘क्वारंटाइन’… अद्याप कुणातही करोनाची लक्षण नाहीत, नमुने चाचणीसाठी पाठवले

वाचा:

वाचा:

वाचा:

>> मुंबईत १६ तर पुण्यात दोन नव्या रुग्णांची नोंद; राज्यातील मृतांचा आकडा १२ वर

>> महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्या पोहोचली ३२० वर

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here