हिंगोलीः औंढा नागनाथ शहरातील नगरपंचायतीमध्ये मतदारांनी एक हाती शिवसेनेची सत्ता दिल्यामुळे आज आमदार संतोष बांगर पहिल्यांदाच औंढा नगरीमध्ये दाखल झाले. यावेळी आमदार बांगर यांची घोड्यावरून मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर त्यांचा भव्य सत्कार औंढा नगरीतील नगरपंचायत कमान समोर करण्यात आला आहे. यावेळी कार्यकर्त्यांची मोठी गर्दी दिसून आली. त्यामुळं करोना नियमांचा फज्जा उडाल्याचे चित्र होते.

नवनिर्वाचित नगरसेवक तथा तालुकाप्रमुख साहेबराव देशमुख, नगरसेवक तथा शहर प्रमुख अनिल देव, नगरसेवक कपिल खंदारे, नगरसेवक दिलीपकुमार राठोड, नगरसेवक तथा शिवसेना जिल्हा सरचिटणीस मनोज देशमुख, नगरसेवक राहुल दंतवार, नगरसेवक जया अनिल देशमुख, नगरसेवक शीतल विष्णू पवार, नगरसेवक सपना प्रदिप कनकुटे या नवनिर्वाचित नगरसेवकांनी कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांचा गुलाबाचा हार घालून जंगी स्वागत केले.

वाचाः
औंढा नगरीतील जुन्या बसस्थानक, डॉ हेडगेवार चौक ते नागनाथ मंदिरात पर्यंत घोड्यावर बसून मिरवणूक काढली. यावेळी आमदार संतोष बांगर यांनी मतदारांना हात जोडून त्यांनी मतदारांचे आभार मानले. आमदार संतोष बांगर यांनी श्री नागनाथ देवास दुग्धअभिषेक केला.या सर्व कार्यक्रमास शिवसेना जिल्हा उपप्रमुख संदेश देशमुख, नगरसेवक तथा युवा जिल्हाप्रमुख राम कदम, सुभाषराव बांगर, प्रताप घुगे व ज्येष्ठ कार्यकर्त्या यांच्यासह तालुक्यामधील शिवसैनिक यावेळी उपस्थित होते.

वाचाः
तसच डॉ. हेडगेवार चौक, जुने बसस्थानक, नागनाथ मंदिर परिसरामध्ये फटाक्याची आतिषबाजी करण्यात आली. यावेळी जय भवानी… जय शिवाजी…आमदार संतोष बांगर तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…! आधी घोषणेने औंढा शहर दणाणून गेले.

वाचाः

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here