हायलाइट्स:
- जोधा अकबर चित्रपटावरून सांगलीत २००८ मध्ये दंगल
- संभाजी भिडे सांगली न्यायालयात हजर
- भिडेंसह ४ जणांना जामीन मंजूर
न्यायालयाने संभाजी भिडेंसह ४ जणांना जामीन मंजूर केला, तर माजी आमदार नितीन शिंदे, शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख बजरंग पाटील आणि सुनीता मोरे यांना १५ हजार रुपयांचा दंड ठोठावून जामीन देण्यात आला आहे. दंगल प्रकरणी एकूण ९४ जणांवर गुन्हा दाखल आहे. जोधा अकबर चित्रपट प्रदर्शनाला शिवप्रतिष्ठानने जोरदार विरोध केला. त्यानंतर रस्त्यावर उतरलेल्या आंदोलकांना पोलिसांनी अटकाव केला होता.
तत्कालीन पोलीस अधीक्षक कृष्णप्रकाश यांनी संभाजी भिडे यांना मारहाण केल्याचा आरोप करत शिवप्रतिष्ठानच्या धारकऱ्यांनी आंदोलन सुरू केले होते. आक्रमक झालेल्या धारकऱ्यांनी सांगलीत तोडफोड आणि जाळपोळ केली. दंगलीनंतर सांगलीत संचारबंदी लागू करण्यात आली होती.
दंगल,जाळपोळ आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याबद्दल पोलिसांनी ९४ संशयितांवर गुन्हे दाखल केले होते. या दंगलीत एस.टी. बसेस आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठं नुकसान झालं होतं. तसंच आंदोलकांनी काही खासगी वाहनांची तोडफोड करत इमारतींवरही दगडफेक करून दहशत निर्माण केली होती.