| महाराष्ट्र टाइम्स.कॉम | Updated: Jan 27, 2022, 10:51 PM

जिवंत भेकाराच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना भिवंडी येथे वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. या तिघांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

The forest department has arrested three persons for smuggling deer calves

भेकराच्या पिल्लाची तस्करी; त्रिकुटाला वनविभागाने केली अटक

हायलाइट्स:

  • भेकराच्या पिल्लांची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक.
  • भिवंडी न्यायालयाने तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
  • वन अधिकारी या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

ठाणे:भिवंडी येथे जिवंत भेकाराच्या पिल्लाची तस्करी करणाऱ्या तीन जणांना वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. हे त्रिकुट भेकाराच्या पिलाची तस्करी करून विक्री करणार असल्याची माहिती वनविभागाला मिळाल्यानंतर वनविभाग अधिकाऱ्यांनी सापळा रचत या त्रिकुटाला अटक करण्यात आली आहे. (the forest department has arrested three persons for smuggling deer calves)

ठाण्यातील भिवंडी तालुक्यात कासणे गावाच्या हद्दीतील पॅरामाउंट हॉटेल शेजारी काही जन एका जिवंत भेकाराच्या पिल्लाची तस्करी करून विक्री करणार असल्याची माहिती वनविभाग खात्याला गुप्त बातमीदारांकडून मिळाली होती. त्यानंतर वनविभाग अंतर्गत मांडवी उपविभागीय वन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पडघा येथील वनक्षेत्रपाल एस. बी. देवरे यांच्या नेतृत्वखाली वनविभागाच्या पथकाने सापळा रचून भेकर जातीचे पिल्लाची तस्करी करून अवैध विक्रीचा व्यवहार करण्यासाठी आलेल्या तीन जणांना ताब्यात घेतले.

क्लिक करा आणि वाचा- धक्कादायक घटना! विवाहितेच्या आत्महत्येस कारणीभूत कुटुंबीय मोकाट

या ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर वन्यजीव अधिनियम १९७२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या तिघांना भिवंडी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या तिनही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या त्रिकुटाने हे भेकाराचे पिल्लू कुठून आणले? कशासाठी आणल होते? ते कोणाला विक्री करणार होते? याचा तपास वनविभाग अधिकारी करत आहेत.

क्लिक करा आणि वाचा- ‘धर्मवीर… मुक्काम पोस्ट ठाणे’ धर्मवीर आनंद दिघे यांच्या जीवनावर चित्रपट लवकरच

क्लिक करा आणि वाचा- एसटी संपातील तरूण कर्मचाऱ्यावर रस्त्यावर भाजीपाला विकण्याची वेळ; कुटुंब उपाशी राहू नये म्हणून….

जवळच्या शहरातील बातम्या

Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

Web Title : the forest department has arrested three persons for smuggling deer calves
Marathi News from Maharashtra Times, TIL Network

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here