नवी दिल्ली : ‘अतिसंसर्गजन्य असलेल्या ओमायक्रॉन या करोना विषाणूच्या प्रकाराला सौम्य समजणे धोकादायक ठरू शकते,’ असा इशारा जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस अॅडहनोम घेब्रेसस यांनी सोमवारी दिला. ‘चाचण्या आणि लसीकरण या साधनांचा सुयोग्य वापर आणि पूरक धोरणे आखल्यास या वर्षी या जागतिक साथीची तीव्रता कमी होण्याची शक्य आहे,’ असेही घेब्रेसस म्हणाले.

आरोग्य संघटनेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. ‘ओमायक्रॉनची माहिती जगाला होऊन फक्त नऊ आठवडे झाले आहेत. मात्र, या प्रकाराची बाधा झालेल्या आठ कोटी रुग्णांची नोंद आरोग्य संघटनेकडे झाली आहे. ही संख्या संपूर्ण २०२०मधील एकूण रुग्णसंख्येपेक्षा अधिक आहे. करोनाचे आणखी उत्परिवर्तित प्रकार आढळू शकतात, अशी स्थिती आहे.’

‘आरोग्य संघटनेने या वर्षीच्या मध्यापर्यंत जगभरातील प्रत्येक देशातील ७० टक्के नागरिकांचे लसीकरण पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यात सहव्याधी असणाऱ्यांवर भर दिला जाणार आहे. चाचण्यांची संख्या वाढविणे, संक्रमणदराचा आणि नव्या उत्परिवर्तित प्रकारांचा सातत्याने मागोवा घेणे, हे केल्यास यंदा आपण महासाथीच्या कचाट्यातून बाहेर पडू शकू,’ असा विश्वासही घेब्रेसस यांनी व्यक्त केला.
IAS Cadre Rules: केंद्राचा ‘हा’ प्रस्ताव घटनाबाह्य!; १०९ निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली भीती
नव्या ३,०६,०६४ रुग्णांची नोंद

मागील २४ तासांत देशात तीन लाख सहा हजार ६४ नव्या करोनारुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण बाधितांची संख्या तीन कोटी ९५ हजार ४३ हजार ३२८ झाली आहे. दुसरीकडे देशातील उपचाराधीन रुग्णांची संख्या २२ लाख ४९ हजार ३३५वर पोहोचली असून, हा मागील २४१ दिवसांतील उच्चांक आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी ही माहिती दिली. सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार, देशात ४३९ करोनारुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे या आजारामुळे आत्तापर्यंत दगावलेल्यांची एकूण संख्या चार लाख ८९ हजार ८४८ झाली आहे. गेल्या २४ तासांत उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत ६२ हजार १३०ने भर पडली आहे.
Coronavirus Updates: करोनाबाबत धक्कादायक माहिती आली समोर; ‘ज्यांनी लस घेतली नाही तेच…’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here