बीजिंग, चीन :

चीनसोबत भारताच्या सीमावादात कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपास चीननं विरोध केलाय. ‘भारत आणि चीन या दोन देशांचा हा सीमा विवाद आहे. या वादात दोन्ही पक्षांचा कोणत्याही तिसऱ्या देशाच्या हस्तक्षेपाला विरोध असेल’ असं चीनच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलंय. याचसोबत ‘भारतासोबत लष्करी स्तरावरील चर्चेची नवीन फेरी सकारात्मक आणि रचनात्मक ठरल्याचं’ही चीनच्या संरक्षण मंत्रालयानं नमूद केलंय.

अमेरिकेकडून करण्यात आलेला ‘शेजारी राष्ट्रांवर अरेरावी करण्याचा’ आरोपही चीनच्या संरक्षण मंत्रालयाकडून फेटाळून लावला आहे.

१२ जानेवारी रोजी भारत आणि चीन यांच्यात लष्करी स्तरावर चर्चेची १४ वी फेरी पार पडली. यावेळी पूर्व लडाखमधील उर्वरित भागांतील समस्यांवर परस्पर स्वीकारार्ह तोडगा काढण्यासाठी दोन्ही बाजूंनी लष्करी आणि राजनैतिक माध्यमांद्वारे चर्चा सुरू ठेवण्याचं मान्य करण्यात आलंय. देशाचा सीमा प्रश्न योग्य पद्धतीनं हाताळण्यासाठी भारतासोबत जवळून काम करणार असल्याचंही चीननं म्हटलंय.
Pakistan China: भारताच्या वज्र तोफा, पिनाका रॉकेटची पाकिस्तानला धडकी; चीनसोबत नवी खेळी
Hamid Ansari: नाव न घेता माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मोदी सरकारवर टीका

चिनी संरक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ कर्नल वू कियान यांनी गुरुवारी एक पत्रकार परिषद घेतली. यावेळी, ‘व्हाईट हाऊस’चे प्रेस सेक्रेटरी झेन साकी यांच्या वक्तव्यावर जोरदार आक्षेप व्यक्त केला. १२ जानेवारी रोजी झेन साकी यांनी चीन आपल्या शेजाऱ्यांना धमकावण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. तसंच ‘अमेरिका परिस्थितीवर लक्ष ठेवून’ असल्याचं वक्तव्य साकी यांनी भारताच्या सीमेवर चीनच्या आक्रमक वर्तनावर विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना केलं होतं.

यावर बोलताना, ‘काही अमेरिकन राजकारण्यांना जबरदस्ती या शब्दाचा वापर खूप आवडतो. पण ते विसरले आहेत की बळजबरीने कूटनीतीचा शोध अमेरिकेनंच लावलाय’ अशा शेलक्या शब्दांत वू कियान यांनी अमेरिकेला प्रत्यूत्तर दिलं. ‘चीन-भारत सीमा वाद हा दोन देशांतील अंतर्गत वाद आहे. यात कोणत्याही तिसऱ्या पक्षाच्या हस्तक्षेपास आम्ही विरोध करतो’, असं वू कियान यांनी म्हटलं.

US Ukraine Russia: अमेरिकेनं युक्रेनला धाडलेल्या प्रत्येक मिसाईलवर कोरलं ‘पुतीन’ यांचं नाव!
CAA: ‘उमर खालिद, शरजील आणि सफुराची कैदेतून सुटका करा’, विदेशातूनही उठला आवाज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here