हायलाइट्स:
- भिवंडीत पुन्हा भीषण आग
- फर्निचर गोदामे जळून खाक
- मोठी वित्तहानी, जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही
- आग नियंत्रणात आणण्यासाठी जवानांचे शर्थीचे प्रयत्न
भिवंडी अग्निशमन केंद्राकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आगीच्या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कर्मचारी चार अग्निशमन बंब घेऊन घटनास्थळी पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू केले. या आगीत अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
सुरुवातीला एका फर्निचर गोदामाला लागलेली आग काही वेळातच पसरली. त्यानंतर इतर दोन गोदामांना आगीनं विळख्यात घेतलं. चार अग्निशमन बंब घटनास्थळी असल्याचे सांगण्यात येत आहे. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असे अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी ‘एएनआय’ या वृत्तसंस्थेला सांगितले.
भिवंडी तालुक्यातील कशेळी या ठिकाणी असलेल्या चामुंडा कॉम्प्लेक्स परिसरात फर्निचर मार्केटमध्ये फर्निचरच्या गोदामाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण अचानक आग लागली. या आगीत संपूर्ण फर्निचरचं गोदाम जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. आग एवढी भीषण होती की या आगीने आजूबाजूच्या फर्निचर गोदामांनाही कवेत घेतलं.
शासनाकडून रस्त्यासाठी प्रतिक्षाच, अखेर ग्रामस्थांनी हाती घेतलं कुदळ, फावडे
भिवंडीच्या कशेळी गावाचा चामुंडा कॉम्प्लेक्स परिसरात पुन्हा आग लागली. या आगीत फर्निचरची तीन गोदामे जळून खाक झाली. या घटनेची माहिती अग्निशमन दलाला मिळाल्यानंतर भिवंडी अग्निशमन दलाचा एक बंब, तसेच ठाणे अग्निशमन दलाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. परंतु आग एवढी भीषण होती की या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल चार ते पाच तासांचा वेळ लागला असल्याची माहिती अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. या गोदामामध्ये मोठ्या प्रमाणात फर्निचर तसेच फर्निचर बनवणाऱ्या मशीन ठेवण्यात आल्या होत्या. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असावी, असा कयास अग्निशमन दलाकडून व्यक्त करण्यात आला आहे.