औरंगाबाद : औरंगाबादच्या क्रांती चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याची स्थापना करण्यात येत आहेत. तसेच १० फेब्रुवारीला महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन करण्याचे नियोजन प्रशासनाकडून सुरू आहे. मात्र, त्यापूर्वीच एमआयएम, मराठा क्रांती मोर्चा आणि भाजप यांनी घेतलेल्या वेगवेगळ्या भूमिकेमुळे शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरुन वाद पेटण्याची शक्यता आहे.
मराठा क्रांती मोर्चा आणि एमआयएमकडून अशी भूमिका घेतली जात असतानाच, भाजपने वेगळीच भूमिका घेतली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन १० फेब्रुवारीऐवजी १९ फेब्रुवारीला म्हणजेच शिवजयंतीच्या दिवशी करावे अशी भूमिका घेतली आहे. तर १० फेब्रुवारीला उद्घाटन केलं तर आम्ही विरोध करू अशी भूमिका भाजपने घेतली आहे.