चंद्रपूर : कैद्यांचा मनोरंजनासाठी महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी कारागृहाला दोन टिव्ही संच भेट दिले. कारागृहातील कैद्यांशी संवाद साधतांना ते म्हणाले ” चंद्रपूरात स्थायी व्हावं अशी माझी इच्छा. तसं झालं तर तुमच्याशी किमान महिन्यातून एकदा भेट घेता येईल. यावरुन बोलताना धानोरकरांनी आमदार सौ. धानोरकरांकडे बघून एका असा विनोद केली की त्याची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.

ते म्हणाले की, ‘कारागृहातील कैद्यांच्या समस्या समजून घेता येईल. मात्र, हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा आम्हच्या हिटरल मॅडम आम्हाला परवानगी देतील” . खासदार धानोरकरांनी आमदार सौ. धानोरकरांकडे बघून हे वाक्य म्हटलं. या वाक्यावर एकच हसा पिकला. एव्हाना आक्रमक असलेल्या धानोरकरांचा हा विनोदी स्वभाव कैद्यांना भावला.

ओमिक्रॉनबद्दल आली धक्कादायक माहिती समोर, जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांकडून इशारा
पुढे धानोरकर म्हणाले की” बायको घरी हीटलरच असते. ज्याची परस्थिती त्यांनाच ठाऊक. तुम्ही इकडे आहात ( कारागृहात ) बरे आहात. घरी असते तर तुमचीही परस्थिती फार वेगळी नसती. जिसको बिवी है उसको पता है. जिसको नही है उसका ठिक है. कारागृहात जेलर आहेत. घरी गेल्यावर ते जेलर नाही. जेलर कुणी वेगळेच असतात.” असंही यावेळी ते म्हणाले.

इतकंच नाही तर ‘चूका झाल्यात. त्या चूका भविष्यात आपल्याला दुरस्त करायचा आहेत. कुठलाही निर्णय घेताना शांत डोक्याने निर्णय घ्या. झालं ते विसरून नव्या आयुष्याला सूरवात करा’, असा संदेश यावेळी त्यांनी कैद्यांना दिला.

ST Strike Update : एसटी संप मिटला का? गुरुवारी राज्यात ८ हजार बसेस धावल्या, आता फक्त १० आगार बंद…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here