हायलाइट्स:

  • इमर्सनजवळ १९ जानेवारी रोजी आढळले मृतदेह
  • मानवी तस्करीचं प्रकरण असल्याचा संशय
  • हे कुटुंब १२ जानेवारी २०२२ रोजी टोरंटोमध्ये दाखल झालं होतं

न्यूयॉर्क, अमेरिका :

काही दिवसांपूर्वी अमेरिका – कॅनडा सीमेजवळ एका अर्भकासह चार भारतीयांचं कुटुंब मृतावस्थेत आढळून आलं होतं. या कुटुंबाची ओळख पटवण्यात यश आलंय. कॅनडाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे कुटुंब काही काळापासून देशात दाखल झालं होतं. त्यांना कुणीतरी एका गाडीतून सीमेपर्यंत नेलं होतं. हे मानवी तस्करीचं प्रकरण असल्याचं प्राथमिकदृष्ट्या समोर आलं होतं.

मॅनिटोबाच्या रॉयल कॅनेडियन माउंटेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतांमध्ये जगदीश बलदेवभाई पटेल (३९ वर्ष), वैशालीबेन जगदीशकुमार पटेल (३७ वर्ष), विहांगी जगदीश कुमार पटेल (११ वर्ष) आणि धर्मिक जगदीश कुमार पटेल (३ वर्ष) यांचा समावेश आहे. हे कुटुंब गुजरातची राजधानी गांधीनगरच्या दिलगुचा गावचे रहिवासी होते. हे कुटुंब १२ जानेवारी २०२२ रोजी टोरंटोमध्ये दाखल झालं होतं. तिथून १८ जानेवारीच्या आसपास हे कुटुंब इमर्सनला पोहचल्याचं समजतंय.

‘मानवी तस्करी’चे बळी? थंडीत गारठून कॅनडा-अमेरिका सीमेवर गुजराती कुटुंबाचा मृत्यू, एकाला अटक
Pakistan China: भारताच्या वज्र तोफा, पिनाका रॉकेटची पाकिस्तानला धडकी; चीनसोबत नवी खेळी
हे सर्व एकाच कुटुंबातील सदस्य होते. कॅनडा-अमेरिका सीमेपासून जवळपास १२ मीटर अंतरावर मॅनिटोबाच्या इमर्सनजवळ १९ जानेवारी रोजी मृतावस्थेत आढळले होते. कुटुंबात एक प्रौढ पुरुष, प्रौढ महिला, किशोरवयीन पुरुष आणि अर्भक यांचा समावेश असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी प्राथमिक चौकशीनंतर दिली होती. परंतु, नंतर मृतांमध्ये एक किशोरवयीन मुलगी आणि एका लहान मुलाचा समावेश असल्याचं नोंदवण्यात आलं.

भारतातून कॅनडात दाखल झालेलं हे कुटुंब अमेरिकेच्या सीमेत दाखल होण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र, अचानक हवामान बिघडल्यानं बर्फाळ भागातील अत्याधिक थंडीत गारठून त्यांचा रस्त्यातच मृत्यू झाला, असा संशय व्यक्त करण्यात येतोय.

घटनास्थळावर कोणतही वाहन आढळलं नाही. त्यामुळे कुणीतरी या कुटुंबाला सीमेजवळ पोहचल्यानंतर त्यांना तिथेच सोडून निघून गेल्याची शक्यता अधिकाऱ्यांनी व्यक्त केलीय.

या प्रकरणात मानवी तस्करीच्या आरोपाखाली फ्लोरिडाचा रहिवासी असलेल्या ४७ वर्षीय स्टिव्ह शँड याला अमेरिकेत अटक करण्यात आली होती. मात्र, सुटकेसाठी कोणताही बॉन्ड न भरता त्याची काही दिवसांत सुटका करण्यात आली. स्टिव्ह शँड याच्यावर दोन भारतीयांना अवैध रुपात अमेरिकेत दाखल करण्याचा आरोप होता. तसंच कॅनडा सीमेजवळ थंडीत गारठून चार जणांच्या मृत्यू प्रकरणात आरोपी बनवण्यात आलं होतं.

India Pakistan: ‘भारताकडून स्थानिक गुंडांना पैसे’; पाकिस्तान गृहमंत्र्यांची वाचाळ बडबड
Pakistan: पाकिस्तानात कट्टरपंथियांकडून हिंगलाज मंदिरावर हल्ला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here