हायलाइट्स:
- सिंधुदुर्गातील शिवसेना पदाधिकारी संतोष परब हल्ला प्रकरण
- नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला
- नितेश राणे कोर्टाच्या आदेशानंतर जिल्हा न्यायालयात हजर
- नियमित जामीनासाठी अर्ज दाखल करणार
शिवसेना पदाधिकारी संतोष परब यांच्यावरील हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचे नाव आल्यानंतर ते अडचणीत सापडले आहेत. परब यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप नितेश यांच्यावर करण्यात आला आहे. त्यानंतर या प्रकरणात अटक टाळण्यासाठी सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती. मात्र, सुप्रीम कोर्टाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले होते. त्यांना दहा दिवसांत जिल्हा व सत्र न्यायालयात हजर राहून नियमित जामीन अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. त्यानंतर आजच, शुक्रवारी नितेश राणे हे न्यायालयात हजर झाले आहेत. त्यांनी नियमित जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यावर सुनावणी सुरू झाली आहे.
अॅड. सतीश माने शिंदे आणि अॅड. संग्राम देसाई हे नितेश राणे यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणार आहेत. आमदार राणेंसोबत त्यांचे बंधू निलेश राणे हे देखील न्यायालयात उपस्थित आहेत.