मॉस्को, रशिया :

रशियाकडून युक्रेनवर संभाव्य हल्ला टाळण्यासाठी अमेरिकेकडून हरएक तऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या मान्यतेनंतर युक्रेनला अब्जावधी डॉलर्सची क्षेपणास्त्रं, तोफा आणि टँकसाठी दारुगोळा आणि इतर शस्त्रास्त्र धाडली आहेत. यासोबतच बायडेन प्रशासनाकडून आता रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन, त्यांचे कुटुंब आणि कथित मैत्रीण अलिना काबाएवा यांच्यावरही निर्बंध लादण्याचे संकेत दिले आहेत. इतकंच नाही तर बायडेन प्रशासनाकडून रशियावर कठोर आर्थिक आणि व्यापारी निर्बंध लादण्याची धमकीही देण्यात आलीय. अमेरिकेच्या या धमक्यांमुळे रशियाची आक्रमकता कमी होण्याची शक्यता आहे.

कोण आहे अलिना काबाएवा?

अमेरिकेच्या धमक्यांत व्लादिमीर पुतीन यांची कथित गर्लफ्रेंड अलिना काबाएवा हिच्या नावाचा समावेश झाल्यानंतर अनेकांच्या नजरा या प्रकरणाकडे वळल्या आहेत. या निमित्तानं अलिना पुन्हा एकदा चर्चेत आलीय.

१२ मे १९८३ रोजी जन्मलेली अलिना काबाएवा या एक रशियन राजनेत्या आहेत. याशिवाय त्यांची मीडिया मॅनेजर आणि जिम्नॅस्ट म्हणूनही ओळख आहे. अलिना काबाएवा यांनी ‘रिदमिक जिम्नॅस्ट’च्या इतिहासात रशियासाठी सर्वाधिक पदकं जिंकली आहेत. अलिना यांनी दोन ऑलिम्पिक पदके, १४ विश्व चॅम्पियनशिप पदके आणि २१ युरोपियन चॅम्पियनशिप पदके जिंकली आहेत.

भारत-चीन सीमावादात तिसऱ्याचा हस्तक्षेप नामंजूर, चीनचा अमेरिकेवर जळफळाट
Pakistan China: भारताच्या वज्र तोफा, पिनाका रॉकेटची पाकिस्तानला धडकी; चीनसोबत नवी खेळी
अलिनाचा राजकारणात प्रवेश

खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर अलिना काबाएवा यांनी राजकारणात प्रवेश केला. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या ‘युनायटेड रशिया पक्षा’च्या त्या खासदार बनल्या.

‘द सन’नं दिलेल्या वृत्तानुसार, अलिनाने एका मॅगझिनच्या झळकण्यासाठी सेमी न्यूड पोज दिली होती. त्यांनी गायक म्हणून प्रसिद्ध होण्यासाठीही खूप प्रयत्न केले, पण यात मात्र त्यांना यश मिळू शकलं नाही.

२००७ ते २०१४ या कालावधीत अलिना काबाएवा रशियन संसदेच्या खालच्या सभागृहाच्या ‘डेप्युटी स्टेट ड्यूमा’ होत्या. याव्यतिरिक्त, सप्टेंबर २०१४ मध्ये त्यांची रशियाच्या ‘नॅशनल मीडिया ग्रुप’च्या संचालक मंडळाच्या अध्यक्ष पदावर नियुक्ती झाली होती.


पुतीन आणि अलिनाचे संबंध?

रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अलिना यांच्या संबंधांच्या चर्चा पहिल्यांदा २००८ मध्ये सुरू झाल्या. याआधी २००४ मध्ये अलिना यांचं नाव रशियाचे नेते डेव्हिड मुसेलियानी यांच्यासोबत जोडलं गेलं होतं. मात्र, वर्षभराच या दोघांचे संबंध संपुष्टात आले होते. रशियन वृत्तपत्र ‘मॉस्कोवस्की’नं पहिल्यांदा पुतिन आणि अलिना संबंधांमध्ये असल्याची बातमी दिली होती. मात्र, अडचणीत आल्यानंतर ही बातमी नाकारण्यात आली आणि संबंधित वृत्तपत्रंही बंद करण्यात आलं.

Hamid Ansari: नाव न घेता माजी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांची मोदी सरकारवर टीका
CAA: ‘उमर खालिद, शरजील आणि सफुराची कैदेतून सुटका करा’, विदेशातूनही उठला आवाज
अलिना-पुतीन यांची मुलं?

२०१५ मध्ये अलिनानं पुतीन यांच्या एका मुलाला जन्म दिल्याच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र या वृत्ताचंही खंडन करण्यात आलं. २०१९ मध्येही अलिना यांनी मॉस्को इथल्या हॉस्पिटलमध्ये दोन मुलांना जन्म दिल्याचं वृत्त समोर आलं होतं. या मुलांच्या जन्मावेळी अलिना यांना राहण्यासाठी संपूर्ण हॉस्पिटलचा व्हीआयपी फ्लोअर रिकामा करण्यात आला होता, असंही वृत्त समोर आलं होतं. मात्र, काही दिवसांनी ही बातमी देणाऱ्या ‘मोस्कोवस्की’ला ही संपूर्ण बातमी आपल्या वेबसाईटवरून हटवावी लागली.

पुतीन यांचा विवाह, पत्नी आणि मुलं

व्लादिमीर पुतिन यांच्याविषयी बोलायचं झालं तर १०८३ मध्ये त्यांनी ल्युडमिला शक्रेबनेवा यांच्याशी विवाह केला होता. पुतीन यांना ल्युडमिला यांच्यासोबत दोन मुली आहेत. त्यांच्या एका मुलीचं नाव मारिया पुतिना तर दुसरीचं येकातेरिना पुतिना असं आहे.

Russia Ukraine Crisis: भारत दौऱ्यावर एक ‘चूक’… आणि जर्मन नौदल प्रमुखांवर राजीनाम्याची वेळ!
Human Smuggling: अमेरिका-कॅनडा सीमेवर मृतावस्थेत आढळलेल्या भारतीय कुटुंबाची ओळख पटली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here