नांदेड : नुकत्याच झालेल्या अर्धापुर नगरपंचायत इथल्या निवडणुकीत मंत्री अशोक चव्हाण यांनी प्रचंड ताकत लावली होती, अर्धापुरमध्ये काँग्रेसचे तगडे आव्हान असताना देखील एमआयएमने तीन जागा जिंकत नांदेडमध्ये पुनरागमन केलं. एमआयएमला मिळालेल्या या यशानंतर पक्षाने आता नांदेड महापालिकेच्या निवडणुकीवर डोळा ठेऊन पक्ष विस्ताराला सुरुवात केली आहे. काँग्रेससह इतर पक्षातील महत्वाच्या महिला नेत्यांनी एमआयएममध्ये प्रवेश केला. महिलांच्या या प्रवेशामुळे जुन्या नांदेड शहरात कार्यकर्त्यांचे एमआयएमचे राजकीय बळ वाढले आहे.

एमआयएमचे राज्यातील प्रवेशद्वार नांदेड

२०१३ साली एमआयएमने नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र निवडणूक लढवत अकरा जागी यश मिळवलं होत, तसेच तत्कालीन काँग्रेसच्या आठ उमेदवारांना एमआयएममुळे पराभूत व्हावे लागले होते. एमआयएमचा हा त्यावेळी राज्याच्या राजकारणात झालेला उदय सर्वानाच आश्चर्यचकित करणारा असा होता. त्या नंतरच्या अनेक निवडणुकीत एमआयएमने काँग्रेसची डोकेदुखी वाढवली होती. यावेळी एमआयएमच्या उदयामुळे सर्वच माध्यमांनी त्याची भली बुरी अशी नोंद घेतली होती.
अख्ख्या सोसायटीने केला आत्मदहनाचा प्रयत्न, आता पडलं महागात!
एमआयएम वंचित आघाडीच्या युतीने काँग्रेसने लोकसभा गमावली

एमआयएमला मुस्लिम बहुल भागात मिळालेल्या या यशानंतर वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांनी एमआयएमशी युती केली. त्यांनतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीचे उमेदवार यशपाल भिंगे यांनी दीड लाखांच्या आसपास मते मिळवली होती. त्यातून काँग्रेसचे अशोक चव्हाण यांना लोकसभा निवडणुकीत आपल्या आयुष्यातील दुसऱ्या पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर आलेल्या विधानसभा निवडणुकीत एमआयएम आणि वंचित आघाडी तुटल्याने या पक्षाचा फारसा प्रभाव दिसला नाही.

ST Strike Update : एसटी संप मिटला का? गुरुवारी राज्यात ८ हजार बसेस धावल्या, आता फक्त १० आगार बंद…

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी घेतली होती एमआयएमची दखल

आपल्या आक्रमक भाषणाच्या बळावर एमआयएम ने २०१३ साली नांदेड महापालीका निवडणूक लढवली होती. त्यात एमआयएमचे ११ उमेदवार आश्चर्यकारकरित्या निवडून आले होते, तर एम आय एम मुळे कॉंग्रेसला आठ जागी अपयश आले. यामूळे त्यावेळी खूद्द स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चक्राऊन गेले होते. बाळासाहेबांनी त्यावेळी आपल्या भाषणातुन एमआयएम चा उल्लेख केल्याने राज्याचे लक्ष वेधल्या गेले होते. आता पुन्हा हीच एमआयएम नांदेडमधूनच कामाला लागलीय, त्यासाठी कधी नाही ते आता एमआयएमने सक्रिय राजकारणात महिलांना संधी देत पक्षात सामावून घेतलंय. त्यामुळे एमआयएमची वाढती तयारी आगामी काळात काँग्रेससाठी डोकेदुखी वाढवणारी ठरू शकते.

जिसको बिवी है उसकोही पता है! भर कार्यक्रमात काँग्रेसच्या खासदारांनी आमदार पत्नीला म्हटलं…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here