हायलाइट्स:

  • कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री येदियुरप्पा यांच्या नातीचा मृतदेह आढळला
  • बेंगळुरूतील घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला मृतदेह
  • प्रथमदर्शनी डॉ. सौंदर्या यांनी आत्महत्या केल्याची शक्यता

बेंगळुरू: कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बी. एस. येदियुरप्पा यांच्या नातीचा मृतदेह घरात आढळून आला. बेंगळुरूतील निवासस्थानी तिचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत सापडला. प्रथमदर्शनी ही आत्महत्या असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. सौंदर्या असे त्यांच्या नातीचे नाव असून, त्या डॉक्टर होत्या.

बेंगळुरूतील वसंतनगरमध्ये शुक्रवारी ही घटना घडली. बी. एस. येदियुरप्पा यांची नात सौंदर्या नीरज यांचा मृतदेह घरात लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. सौंदर्या या एमएस रमैया रुग्णालयात सेवेत होत्या. २०१९ मध्ये डॉ. नीरज यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता.

Bhaiyyu Maharaj Suicide Case: भय्यू महाराज यांच्या आत्महत्येमागे होते ‘हे’ कारण; पलकसह तिघांना ६ वर्षांची शिक्षा
Black fungus : ओमिक्रॉन लाटेत काळ्या बुरशीचा मुंबईत पुन्हा शिरकाव, ७० वर्षीय महिला रुग्णामध्ये आढळली लक्षणे

आज शुक्रवारी ही घटना उघडकीस आली. घरातील नोकराने बऱ्याच वेळा दरवाजा ठोठावला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद मिळाला नाही. अखेर त्या नोकराने डॉ. नीरज यांना फोन केला. नीरज यांनी दरवाजा उघडल्यानंतर त्यांना सौंदर्या यांचा मृतदेह आढळून आला. मृतदेह बेडरूममधील पंख्याला लटकलेल्या अवस्थेत होता. डॉ. सौंदर्या यांनी आत्महत्या केल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here