वुहान, चीन :

करोना विषाणू पहिल्यांदा ज्या शहरात सापडला त्या चीनच्या ‘वुहान‘ शहरातील वैज्ञानिकांकडून एक धोक्याचा इशारा देण्यात आलाय. या वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार, एक नवा करोना विषाणू जगात दाखल झालाय. करोना विषाणूच्या या नव्या प्रकाराला तज्ज्ञांनी ‘निओकोव्ह’ (NeoCov) असं नाव दिलंय. धक्कादायक म्हणजे, विषाणूच्या या प्रकारामुळे मृत्यूच्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

निओकोव्ह हा नवीन करोना विषाणू मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आहे. या विषाणून संक्रमितांत प्रत्येक ३ रुग्णांपैंकी एका संक्रमिताला आपले प्राण गमवावे लागू शकतात. त्यामुळे मृतांच्या आकडा उसळी घेण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केलीय.

दिलासादायक गोष्ट म्हणजे, निओकोव्ह या नव्या करोना विषाणूचं संक्रमण अद्याप मानवांमध्ये आढळून आलेलं नाही.

रशियन न्यूज एजन्सी ‘स्पुतनिक’च्या रिपोर्टनुसार, निओकोव्ह हा करोना व्हायरस ‘मर्स कोव्ह विषाणू’शी संबंधित आहे. २०१२ आणि २०१५ मध्ये पश्चिम आशियातील देशांमध्ये या विषाणूचा संसर्ग पहिल्यांदा आढळून आला होता.

हे SARS-CoV-2 प्रमाणेच या करोना विषाणूचं मानवांमध्ये संक्रमण होण्याचा धोका आहे.

Human Smuggling: अमेरिका-कॅनडा सीमेवर मृतावस्थेत आढळलेल्या भारतीय कुटुंबाची ओळख पटली
US Ukraine Russia: अमेरिकेनं युक्रेनला धाडलेल्या प्रत्येक मिसाईलवर कोरलं ‘पुतीन’ यांचं नाव!
सध्या निओकोव्ह हा विषाणू दक्षिण आफ्रिकेतील वटवाघळांत आढळून आला आहे. अजूनपर्यंत या विषाणूचं संक्रमण केवळ प्राण्यांतच आढळून आलंय.

BioRxiv या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, NeoCoV आणि त्याचा जवळचा सहकारी PDF-2180-CoV मानवांनाही संक्रमणाच्या जाळ्यात ओढू शकतात.

‘वुहान युनिव्हर्सिटी’ आणि ‘चायना अॅकॅडमी ऑफ सायन्सेस’च्या संशोधकांच्या मते, मानवी पेशींना संक्रमित करण्यासाठी या नवीन करोना विषाणूसाठी फक्त एक उत्परिवर्तन आवश्यक आहे.

NeoCoV या विषाणूमुळे MERS प्रमाणेच अनेक रुग्णांचा मृत्यू होऊ शकतो. हा आकडा दर तीन रुग्णांपैकी एक असादेखील असू शकतो, असाही यात उल्लेख करण्यात आलाय.

Alina Kabaeva: युक्रेनच्या बचावासाठी अमेरिकेच्या टार्गेटवर पुतीन यांची गर्लफ्रेंड, कोण आहे अलिना काबाएवा?अबब! २५ व्या वर्षी २२६ किलो वजन आणि लाखोंची कमाई

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here