वॉशिंग्टन, अमेरिका :

जगात पहिल्यांदाच एखाद्या रोबोटनं कोणत्याही पद्धतीनं मानवी हस्तक्षेपाशिवाय आणि मदतीशिवाय एक शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केलीय. ही शस्त्रक्रिया एका डुक्करावर पार पडली.

अमेरिकेच्या प्रतिष्ठीत ‘जॉन हॉपकिन्स युनिव्हर्सिटी‘च्या ‘स्मार्ट टिश्यू ऑटोनॉमस रोबोट’नं (STAR) ही डुक्कराच्या एका टिश्यूवर ही शस्त्रक्रिया पूर्ण केली.

मानवाच्या तुलनेत रोबोटनं अधिक चांगल्या पद्धतीनं पशूवर शस्त्रक्रिया केल्याचं यात शोधकर्त्यांना आढळून आलं. डुक्करावर ‘लेप्रोस्कोपिक सर्जरी‘ करण्यासाठी रोबोटची मदत घेण्यात आली होती.

अमेरिकन संशोधकांच्या म्हणण्यानुसार, या शस्त्रक्रियेनं ‘रोबोटिक्स’च्या जगात एक नवा इतिहास रचलाय. यामुळे भविष्यात रोबोटच्या मदतीनं मानवावरदेखील शस्त्रक्रिया होऊ शकेल.

या शस्त्रक्रियेद्वारे रोबोटनं डुकराच्या आतड्याची दोन टोकं जोडण्याचं काम केलं. आत्तापर्यंत या प्रकारची शस्त्रक्रिया ५० जनावरांवर करण्यात आली आहे. उच्च कौशल्याची आवश्यकता असणाऱ्या या शस्त्रक्रियेत रोबोटनं उत्कृष्ट काम केल्याचंही संशोधन अहवालात नमूद करण्यात आलंय.

Pakistan China: भारताच्या वज्र तोफा, पिनाका रॉकेटची पाकिस्तानला धडकी; चीनसोबत नवी खेळी
अबब! २५ व्या वर्षी २२६ किलो वजन आणि लाखोंची कमाई
संशोधनाचे ज्येष्ठ लेखक डॉ. एक्सेल क्रिगर यांच्या म्हणण्यानुसार, या शस्त्रक्रियेत जगात पहिल्यांदाच रोबोटनं कोणत्याही मानवी मदतीशिवाय शस्त्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली. डुक्कराच्या पोटातील दोन आतडी जोडणं ही सर्वात आव्हानात्मक गोष्ट आहे आणि त्यासाठी डॉक्टरांच्या हाती कौशल्य आवश्यक आहे. थोडंही दुर्लक्ष किंवा हाताच्या चुकीच्या हालचालीमुळे गंभीर समस्या उद्भवू शकतात.

‘आतड्यांच्या दोन टोकांना जोडणं स्वयंचलित करता येऊ शकतं. एखाद्या शस्त्रक्रियेतील हे अत्यंत कठीण आणि नाजूक काम आहे. रोबोटनं चार प्राण्यांवर ही शस्त्रक्रिया पूर्ण केली. या शस्त्रक्रियेत एखाद्या मानवापेक्षाही अधिक चांगला निकाल रोबोटनं दिलाय, हे आमच्या संशोधनात दिसून आलं’ असं डॉ. एक्सेल क्रिगर यांनी म्हटलंय.

डॉ. एक्सेल हे जॉन्स हॉपकिन्स इथं इलेक्ट्रिकल आणि संगणक अभियांत्रिकीचे प्राध्यापक आहेत. रोबोटमध्ये नवीन फीचर्स आल्याने तो अधिक चांगल्या पद्धतीने काम करू शकणार असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणे आहे.

Alina Kabaeva: युक्रेनच्या बचावासाठी अमेरिकेच्या टार्गेटवर पुतीन यांची गर्लफ्रेंड, कोण आहे अलिना काबाएवा?
Human Smuggling: अमेरिका-कॅनडा सीमेवर मृतावस्थेत आढळलेल्या भारतीय कुटुंबाची ओळख पटली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here