नाशिक : जिल्ह्यातील इगतपुरी शहरात पुन्हा एकदा गॅंगवॉरचा भडका उडाला आहे. दोन गटांमध्ये झालेल्या गोळीबारात एका जणाचा मृत्यू झाला असून आणखी एक जण गंभीर जखमी झाला आहे. राहुल साळवे असं मृत व्यक्तीचं नाव आहे. या गोळीबारामुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून बाजारपेठा बंद करण्यात आल्या आहेत. (Nashik Firing Case)

राहुल साळवे हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर विविध पोलीस ठाण्यांमध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. वर्चस्ववादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनास्थळावरून मारेकरी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे.

संभाजी भिडे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; आता न्यायाधीशांविरोधात केलं ‘हे’ वक्तव्य

इगतपुरी शहरात गेल्या अनेक दिवसांपासून गँगवॉरची चर्चा सुरू होती. मात्र आज गुन्हेगारांमध्ये थेट गोळीबार झाल्याने परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे बाजारपेठा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला असून शहरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here