पुणे : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये (टीईटी) अपात्र ठरलेल्या तब्बल सात हजार ८०० परीक्षार्थींकडून प्रत्येकी एक ते अडीच लाख रुपये घेऊन घेऊन त्यांना पात्र ठरविल्याची धक्कादायक माहिती सायबर पोलिसांच्या तपासात समोर आली आहे. त्याचबरोबर २०१८ मधील परीक्षेमध्येही मोठ्या प्रमाणावर अपात्र परीक्षार्थींकडून पैसे घेऊन पात्र ठरले असून, त्याची पडताळणी सुरू आहे.

पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. पुणे पोलिसांच्या सायबर सेल पोलिसांनी आरोग्य विभाग, म्हाडा आणि टीईटी परीक्षेचा गैरव्यवहार उघडकीस आणला होता. टीईटी परीक्षेमध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी सायबर पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे आणि शिक्षण विभागाचे सल्लागार अभिषेक सावरीकर यांना अटक केली होती. या प्रकरणाचा तपास करीत असताना पोलिसांनी मूळ निकाल आणि प्रत्यक्ष जाहीर केलेला निकाल याची पडताळणी केली. त्या वेळी २०१९-२० च्या परीक्षेत एकूण १६ हजार ५९२ परीक्षार्थींना पात्र केल्याचे दिसून आले. प्रत्यक्षात पोलिसांनी दोन्ही निकाल पडताळून पाहिल्यावर त्यातील तब्बल सात हजार ८०० परीक्षार्थी हे अपात्र होते. तरीही त्यांना निकालामध्ये पात्र ठरविण्यात आल्याचे दिसून आले आहे. २०१९-२० च्या टीईटी परीक्षेतील पहिला पेपर एक लाख ८८ हजार ६८८ उमेदवारांनी दिला होता. त्यातील १० हजार ४८७ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. तर, पेपर दोनसाठी एक लाख ५४ हजार ५९६ जणांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी सहा हजार १०५ जणांना पात्र ठरविण्यात आले होते. हा निकाल १९ जानेवारी २०२० रोजी जाहीर करण्यात आला होता. या पडताळणीत सात हजार ८०० विद्यार्थी अपात्र असताना त्यांना पात्र दाखविल्याचे समोर आले आहे.
Controversy In Maha Vikas Aghadi: निवडणुकीपुरते क्लस्टरचे गाजर! राष्ट्रवादीच्या बॅनरबाजीमुळे आघाडीत बिघाडी
आणखी काहींना अटक होणार?

ज्या अपात्र उमेदवारांना गुण वाढवून देण्यात आले आहेत, अशा उमेदवारांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. अपात्रांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांची पडताळणीही होणार आहे. शिक्षक पात्रता गैरव्यवहाराची व्याप्ती मोठी असून, अपात्र उमेदवारांची यादी शिक्षण विभाग; तसेच राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार असून, याप्रकरणात आणखी काहीजणांना अटक होण्याची शक्यता आहे, असे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.

तीन पद्धतीने केला गैरव्यवहार

टीईटी परीक्षेमध्ये तीन पद्धतीने उमेदवारांना पात्र केल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये ओ एम आर शीटमध्ये बदल, थेट गुण वाढविणे आणि थेट टीईटी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र देणे अशा पद्धतींचा वापर केल्याचे दिसून आले आहे. या उमेदवारांची माहिती काढण्यात येत आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
corona in dharavi: धारावीकरांसाठी आनंदाची बातमी! ३१ दिवसांंनंतर आज एकही नवा रुग्ण नाही

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here