औरंगाबाद : शहरातील महाापालिकेच्या आणि खासगी शाळांमधील इयत्ता आठवी, नववी आणि अकरावीचे वर्ग अटी-शर्तींच्या अधीन राहून सोमवारपासून (३१ जानेवारी) प्रत्यक्ष भरवण्यास महापालिका प्रशासनाने परवानगी दिली आहे.

महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी या बद्दलचे लेखी आदेश शुक्रवारी (२८ जानेवारी) काढले. या आदेशात त्यांनी म्हटले आहे, की शाळा व्यवस्थापक, पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य व इतरांसोबत झालेल्या चर्चेनुसार व मार्गदर्शक सूचनांनुसार महापालिका हद्दीतील फक्त इयत्ता आठवी, नववी व अकरावी चे प्रत्यक्ष वर्ग सोमवारपासून (३१ जानेवारी) अटी व शर्तींच्या अधीन राहून सुरू करण्यास मान्यता देण्यात येत आहे.

राज्यात ७८०० शिक्षक बोगस, टीईटी परीक्षेत पैसे घेऊन अपात्र उमेदवारांना ठरविले पात्र
शाळा सुरु करण्यापूर्वी ४८ तासांपूर्वीची सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक असेल. विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबद्दल पालकांकडून आवश्यक ती लेखी संमती घेण्यात यावी. ज्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे करोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असतील त्यांनी करोनामुक्त झाल्यावरच शाळेत उपस्थित रहावे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीचा पर्याय निवडला आहे, त्या विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने शिक्षण देण्यात यावे. प्राचार्य, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, खासगी वाहन चालक, कंडक्टर, रिक्षाचालक यांनी लसीचे दोन्हीही डोस घेणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना आवश्यकेनुसार शाळेत टप्प्याटप्प्याने तसेच एक दिवसाआड बोलवण्यात यावे.

सुपरमार्केटमध्ये वाइनशॉप नकोच; ‘या’ शहरात व्यापारी संघटनेचा विरोध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here