राजधानी दिल्लीत शनिवारी पेट्रोल ९५.४१ रुपये प्रति लीटर आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. खरंतर, सरकारने ४ नोव्हेंबर २०२१ रोजी किमती बदलल्या होत्या. त्यावेळी सरकारने दर कमी केले होते. त्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
– दिल्ली पेट्रोल ९५.४१ रुपये आणि डिझेल ८६.६७ रुपये प्रति लीटर
– मुंबई पेट्रोल १०९.९८ रुपये आणि डिझेल ९४.१४ रुपये प्रति लीटर
– चेन्नई पेट्रोल १०१.४० रुपये आणि डिझेल ९१.४३ रुपये प्रति लीटर
– कोलकाता पेट्रोल १०४.६७ रुपये आणि डिझेल ८९.७९ रुपये प्रति लीटर
– गांधीनगर पेट्रोल ९५.३५ रुपये आणि डिझेल ८९.३३ रुपये प्रति लीटर
– लखनौ पेट्रोल ९५.२८ रुपये आणि डिझेल ८६.८० रुपये प्रति लीटर
दररोज ६ वाजता बदलतात किंमती
पेट्रोल आणि डिझेलचे दर दररोज सकाळी ६ वाजता बदलतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळपास दुप्पट होते.