औरंगाबाद : महाराष्ट्रात खळबळ उडवून देणाऱ्या सलीम कुरेशीसह शहरात गाजलेल्या विविध खून खटल्यांतील सुपारी किलर इम्रान शेख नासेर शेख ऊर्फ इम्रान मेहदी याला तात्काळ ‘अंडासेल’मधून इतर सेलमध्ये हलवावे, असे निर्देश औरंगाबाद खंडपीठाने दिले आहे. न्या. व्ही. के. जाधव आणि न्या. संदीपकुमार मोरे यांनी हे निर्देश तुरुंग प्रशासनाला दिले आहेत.

सलीम कुरेशीसह पाच जणांची हत्या प्रकरणी इम्रान मेहदी याला ‘मकोका’च्या दोन खटल्यात २०१८ ला शिक्षा ठोठाविण्यात आली होती. त्यानुसार वस्तुत: ‘प्रिजनर्स अॅक्ट’ नुसार कैद्याला अंडासेलमध्ये केवळ १४ दिवसच ठेवण्याची तरतूद आहे. मात्र असे असतानाही शिक्षेदरम्यान मेहदीला तब्बल २ वर्षे ४ महिने अंडासेलमध्ये ठेवण्यात आले आहे. यामुळे त्याचे मानसिक संतुलन बिघडले असून, त्याला तेथून हलवावे, अशी याचिका मेहदीच्या पत्नीने अॅड. रूपेश जैस्वाल यांच्यामार्फत याचिका न्यायालयात दाखल केली आहे.

Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
कोर्टचे निर्देश…

खंडपीठाने निर्देश देतांना म्हटले आहे की, मुख्य न्यायदंडाधिकारी यांनी शनिवारी हर्सल कारागृहात जाऊन मेहदीचा जबाब नोंदवावा. अंडासेलचे निरीक्षण करावे, फोटोग्राफरला सोबत घेऊन, अंडासेलचे फोटो काढून त्याचा अहवाल सोमवारी सादर करण्याचे निर्देश दिले आहे.

आरोग्य अहवालही मागवला…

यावेळी निर्देश देतांना न्यायालयाने, मानसोपचार तज्ञ,डॉक्टर आणि एक तज्ञ अशा तीन जणांच्या पथकाने अंडासेलची पाहणी आणि वैद्यकीय तपासणी करून त्याचा अहवाल सोमवारी न्यायालयात सादर करावा असे निर्देशही न्यायालयाने आरोग्य विभागाला दिले आहे.

भाजपच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द!, सर्वोच्च न्यायालयाकडून उद्धव ठाकरे सरकारला दणका

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here