औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील खाम नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत विविध विकासकामांना देण्यात आलेल्या मंत्री, आमदार आणि खासदारांची नावांची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे. मात्र, अशी नाव देऊन सत्ताधाऱ्यांची लांगूलचालन करणं औरंगाबाद महानगरपालिका आयुक्तांना अंगलट आल्याचे पाहायला मिळत आहे. कारण आमची नाव काढून घेण्याचं पत्र महापालिकेला देणार असल्याची भूमिका आमदार, खासदारांनी घेतली आहे.

पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते खाम नदीच्या पुनरुज्जीवन कार्यक्रमांतर्गत विकासकामांच उद्घाटन करण्यात आले. यावेळी विकासकामांना महानगरपालिकेकडून आदित्य सरोवर, चंद्रकांत योग लॉन, अंबादास फुलपाखरू उद्यान तर सुभाष ऑक्सिजन हब अशी नावे देण्यात आली आहे. मात्र, यावर आमदार, खासदार यांनी वेगळी भूमिका घेतली असून दिलेली नाव तातडीने काढण्याची मागणी केली आहे.

Weather Alert : पुन्हा आस्मानी संकट; ‘या’ राज्यांमध्ये पावसाची शक्यता, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
तर आम्हाला न विचारताच खाम नदीच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या उद्यानातील प्रकल्पांना आमची नावे देण्यात आली. ती काढून घेण्यासाठी मनपा प्रशासनाला पत्र देणार असल्याचे खासदार इम्तियाज जलिल,आमदार अतुल सावे यांच्यासह शिवसेना आमदार संजय शिरसाठ यांनी म्हंटल आहे. तर उद्यान उभारणीसाठी झटणाऱ्यांची किंवा महापुरुषांची नावे प्रकल्पाला द्या, अशी सूचना केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी केली आहे.

शहराचा सात-बारा शिवसेनेच्या नावावर आहे काय?

या प्रकरणावर बोलताना भाजप शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. खाम नदी पुनरुज्जीवन प्रकल्पांत शिवसेना मंत्री, नेते, लोकप्रतिनिधींची नावे देण्याची गरज काय आहे? शहराचा सात-बारा शिवसेनेच्या नावावर असल्याप्रमाणे हा प्रकार आहे. महापालिका, स्मार्ट सिटी, छावणी नगर परिषद या संस्थांचे यात योगदान आहे. शासनाच्या माझी वसुंधरा मोहिमेचा हातभार आहे. त्यामुळे अशा या हुजरेगिरीविरोधात भाजप आंदोलन करणार असल्याचा इशारा शहराध्यक्ष संजय केणेकर यांनी दिला आहे.

राज्यात ७८०० शिक्षक बोगस, टीईटी परीक्षेत पैसे घेऊन अपात्र उमेदवारांना ठरविले पात्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here