काही सजग नागरिकांनी याबाबत तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत होते. या बेफिकिरीमुळे २४ व २६ जानेवारी रोजी धसईतील इंदिरानगर वाडीतील बारकुबाई वाघ,चिखलवाडीतील आशा नाईक यांचा मृत्यू झाला.

डॉक्टर (1)

मुरबाड टोकावडे पोलिसांनी केली बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपला अटक

हायलाइट्स:

  • पांडुरंग घोलप या निवृत्त शिपाईने घरात उघडला दवाखाना
  • बोगस डॉक्टर बनून घेतले ५ जणांचे बळी
  • कोणताही परवाना नसताना घरात उघडला दवाखाना
प्रदीप भणगे, मुरबाड: बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने मुरबाडच्या धसई परिसरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा बोगस डॉक्टर धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात काही वर्षांपूर्वी शिपाई म्हणून काम करत होता. मात्र, त्याला निवृत्त होऊन बराच कालावधी उलटला होता.

बोगस डॉक्टरने चुकीचे उपचार केल्याने दोन दिवसांत पाच जणांचा बळी गेल्याचा धक्कादायक प्रकार मुरबाडमध्ये उघडकीस आला आहे. पांडुरंग घोलप असे या ‘मुन्नाभाई’चे नाव असून तो धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात शिपाई म्हणून काम करीत होता. आदिवासींच्या अज्ञानाचा फायदा घेऊन नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या या नराधम शिपायाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. धसई प्राथमिक आरोग्य केंद्रात गेली अनेक वर्षे शिपाई असलेला पांडुरंग घोलप याने बिनदिक्कतपणे धसईत दवाखाना थाटला होता. नोकरी करतानाच तो य क्लिनिकमध्ये आदिवासींवर उपचार करायचा. सेवेतून निवृत्त झाल्यानंतरही त्याचा हा गोरखधंदा राजरोसपणे सुरुच होता. विशेष म्हणजे यापूर्वी काही सजग नागरिकांनी याबाबत तक्रार करूनही प्रशासन दुर्लक्ष करत होते. या बेफिकिरीमुळे २४ व २६ जानेवारी रोजी धसईतील इंदिरानगर वाडीतील बारकुबाई वाघ,चिखलवाडीतील आशा नाईक यांचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ राम असवले (मिल्हे), अलका मुकणे (मिल्हे), लक्ष्मण मोरे (पळू) यांचाही चुकीच्या उपचारामुळे बळी गेला. या प्रकरणी नातेवाईकांनी टोकावडे पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार केली. त्याची गंभीर दखल घेत पोलिसांनी तत्काळ पांडुरंग घोलपवर गुन्हा दाखल करत अटक केली आहे,
अघोरी! वडिलांना बरे करण्यासाठी भोंदूबाबाने मागितली होती सोन्याची जीभ, चौकशीत…
याप्रकरणी आदिवासी क्रांती सेना या सामाजिक संघटनेने आवाज उठवल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर उमेश वाघमोडे यांच्या फिर्यादीवरून बोगस डॉक्टर पांडुरंग घोलपच्या विरोधात मृत्यूस कारणीभूत आणि कोणताही परवाना नसतांना वैद्यकीय व्यवसाय करत असल्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या बोगस डॉक्टर घोलप याला पोलिसांनी अटक केली असून चार दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.दरम्यान या प्रकरणात सर्व आदिवासींचा मृत्यू झाल्याने अ‍ॅट्रोसिटी कलम देखील या डॉक्टरवर लावण्याची मागणी सामाजिक संघटनांनी केली आहे.

जवळच्या शहरातील बातम्या

मराठी बातम्या अॅप: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.

वेब शीर्षक: खोट्या डॉक्टरने दिले चुकीचे उपचार, महाराष्ट्रात मुरबाड ठाण्यात ५ जणांचा मृत्यू
मराठी बातम्या महाराष्ट्र टाइम्स, टीआयएल नेटवर्क कडून

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here