मॉस्को, रशिया :

युक्रेन सीमेवर एक लाख सैनिकांसही मिसाईल, रणगाडे आणि लढाऊ वाहनं तैनात केल्यानंतर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पहिल्यांदाच या प्रश्नाबाबत आपलं मौन तोडलंय. यावेळी, रशिया-युक्रेन वादात अमेरिका आणि नाटोच्या हस्तक्षेपाबद्दल बोलताना ‘मुख्य प्रश्नांकडे दुर्लक्ष केलं गेलं’, असं पुतीन यांनी म्हटलंय.

‘युक्रेनसोबत सुरू असलेल्या वादावर अमेरिका आणि ‘नाटो’ देशांनी रशियाच्या मुख्य सुरक्षा मागण्या पूर्ण केलेल्या नाहीत’, असं व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलंय. युक्रेन संकट तोंडाशी आल्यानंतर पहिल्यांदाच पुतीन यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्याशी फोनवरील संभाषणात आपल्या मागणीचा पुनरुच्चार केला.

रशियाने युक्रेनला करकचून वेढा घातल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी पूर्व युरोपमध्ये अतिरिक्त सैन्य पाठवण्याची घोषणा केली आहे. याच दरम्यान पुतीन यांनी केलेलं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे.

रशियन राष्ट्राध्यक्ष कार्यालयाच्या क्रेमलिन यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांनी मॅक्रॉन यांच्याशी बोलताना ‘अमेरिका आणि नाटो देशांनी दिलेल्या प्रतिसादांचा अभ्यास करू आणि त्यानंतरच पुढील कारवाई करू’ असं म्हटलंय. याच चर्चेत अमेरिका आणि ‘नाटो’नं आपल्या प्रतिसादात रशियाच्या मुख्य सुरक्षा समस्यांकडे लक्ष दिलेलं नाही, याकडेही पुतीन यांनी लक्ष वेधलं.

Alina Kabaeva: युक्रेनच्या बचावासाठी अमेरिकेच्या टार्गेटवर पुतीन यांची गर्लफ्रेंड, कोण आहे अलिना काबाएवा?
US Ukraine Russia: अमेरिकेनं युक्रेनला धाडलेल्या प्रत्येक मिसाईलवर कोरलं ‘पुतीन’ यांचं नाव!
Russia Ukraine Crisis: युक्रेनचा ‘नाटो’ प्रवेश रोखणार नाही, रशियाच्या मागणीवर अमेरिकेची भूमिका

‘युक्रेनला ‘नाटो’चं सदस्यत्व नको’, पुतीन यांची इच्छा

शीतयुद्ध काळापासून अस्तित्वात आलेल्या ‘नाटो’ या संघटनेचा विस्तार करू नये, तसंच युक्रेनला ‘नाटो’चं सदस्यत्व देण्यात येऊ नये, अशी पुतीन यांची इच्छा आहे. युक्रेनला नाटोचा स्थायी सदस्य होण्यापासून रोखणारी हमी रशियालाही हवी आहे. मात्र, अमेरिकेचा याला आक्षेप आहे.

रशियन सीमेजवळ आक्षेपार्ह शस्त्रे तैनात केली जाऊ नयेत. कोणत्याही देशानं दुसऱ्या देशाची सुरक्षा धोक्यात घालून आपली सुरक्षा मजबूत करू नये, अशी भूमिका पुतीन यांनी स्पष्ट केलीय.

‘रशिया युद्धाला सुरूवात करणार नाही’

याच दरम्यान रशियाचे परराष्ट्र मंत्री सर्गेई लावरोव यांनी शुक्रवारी आपली भूमिका स्पष्ट केलीय. रशिया स्वत:हून युक्रेनविरुद्ध युद्ध सुरू करणार नाही, असं त्यांनी म्हटलंय. मात्र, पश्चिमी राष्ट्रांना आपल्या सुरक्षा हितांना पायदळी तुडवण्याची संधीही रशिया देणार नाही, असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

भारत-चीन सीमावादात तिसऱ्याचा हस्तक्षेप नामंजूर, चीनचा अमेरिकेवर जळफळाट
Pakistan China: भारताच्या वज्र तोफा, पिनाका रॉकेटची पाकिस्तानला धडकी; चीनसोबत नवी खेळी
Hypersonic Engine: चीनकडून जगाला इशारा! नव्या हायपरसॉनिक इंजिनची चाचणी

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here