SSC and HSC Exam: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक म्हणजेच दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दरम्यान करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर या परीक्षा पुढे ढकलण्यात येतील अशी चर्चा सुरु आहे. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिले आहे. पुणे येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

दहावीची लेखी परीक्षा १५ मार्च तर बारावीची लेखी परीक्षा ४ मार्चपासून सुरु होणार आहे. बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा १४ फेब्रुवारी ते ३ मार्चपर्यंत तर दहावीची प्रात्यक्षिक परीक्षा २५ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत होणार आहे. या परीक्षा ऑफलाइन माध्यमातून होणार आहेत. करोना आणि ओमिक्रॉन संसर्गाच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात याव्यात, अशी सूचना शालेय शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दिली आहे. राज्यातील शिक्षण उपसंचालकांच्या बैठकीत बच्चू कडू यांनी या यासंदर्भात सूचना दिल्या होत्या. राज्यातील करोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव पाहता विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर जाणे आरोग्याच्या दृष्टीने हिताचे ठरेल का असा प्रश्न पालकांच्या मनात पडला आहे.

राज्यातील महाविद्यालये १ फेब्रुवारीपासून होणार सुरू
फ्रेशर आहात? सीव्ही बनवताना ‘या’ बाबी लक्षात ठेवा, लगेच मिळेल नोकरी
करोना आणि ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना परीक्षाकेंद्रामध्ये पाठविण्यास धजावणार नाहीत. यासंदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय झाला अशी चर्चा सुरु आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर ते म्हणाले दहावी आणि बारावीची परीक्षा पुढे ढकलण्याबाबत बैठकीत कोणतीही चर्चा झाली नाही. याबाबतचा निर्णय शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड या घेतील असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

SSC and HSC Exam 2022 Date Announced: दहावी, बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा फेब्रुवारीअखेर
Indian Navy मध्ये विविध पदांची भरती, जाणून घ्या तपशील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here