अमरावती : करोनाच्या टाळेबंदीने अनेकांना वेगळ्या पद्धतीने जगायला शिकवलं. ग्रॅज्युएशनपर्यंत शिक्षण पूर्ण करून जिल्ह्यातील चांदूर बाजार येथील युवा शेतकरी प्रथमेश कीटुकले यांनी पारंपरिक शेतीला फाटा देत आधुनिक शेती करत महिन्याला एक लाख ७५ रुपये निव्वळ नफा मिळवला आहे. त्यांनी शेती करु इच्छिणाऱ्या तरुणांसाठी या शेतीचा गुपित सांगितल आहे.
प्रथमेश आणि त्याचे वडिल सुधीर हे दोघेही शेतात राबतात. एका महिन्यापासून या मिरचीचे उत्पादन सुरू झाले आहे. या मिरचीला बाजारात कमीत कमी ३५ ते जास्तीत जास्त ५० रुपये किलोपर्यंत भाव मिळतो. त्यामुळेच या शेतकऱ्याने महिन्याला १ लाख ७५ हजार एवढा निव्वळ नफा मिळवला असून शेती करू इच्छिणाऱ्या तरुणांसाठी त्यांनी शेती तंत्रज्ञानाचे काही गुपित सांगितले आहे.