दिल्लीतील निजामुद्दीन भागात काही दिवसांपूर्वी ‘तबलिगी जमात’नं मरकजचं आयोजन केलं होतं. त्यात शहरातील तब्बल ३२ नागरिक सहभागी झाले होते. त्यापैकी १४ जणांचा महापालिकेने शोध घेतला असून त्यांना रुग्णालयात दाखल केले आहे. त्यांच्या घशातील द्रावाचे नमुने उद्या ‘एनआयव्हीकडे’ तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत.
वाचा:
हे नागरिक शहरात येऊन १५ दिवस उलटून गेले आहेत. त्यामुळं ते अनेकांच्या संपर्कात आले असण्याची दाट शक्यता आहे. यापैकी १८ नागरिकांचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले.
वाचा:
यवतमाळमध्ये पाच विलगीकरण कक्षात
यवतमाळ जिल्ह्यातील १२ जण मरकजमध्ये सहभागी झाले होते. यापैकी यवतमाळ जिल्ह्यात वास्तव्य असलेले पाच जण परत आले असून त्यांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. उर्वरित सात जण अद्यापही जिल्ह्यात परत आलेले नाहीत. यापैकी काही जण परस्पर दुसऱ्या जिल्ह्यात किंवा राज्यात गेले असण्याची किंवा दिल्लीतच थांबले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रशासनाकडून त्यांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे.
वाचा:
राज्यातील करोनाबाधितांचा आकडा दिवसेंदिवस वाढतच असून आतापर्यंत ही संख्या ३२० वर गेली आहे. काल एका दिवसात तब्बल ८२ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर, १२ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनाग्रस्त रुग्णांमध्ये मुंबई खालोखाल जिल्ह्याचा क्रमांक असून जिल्ह्यात आतापर्यंत ५० रुग्ण आढळून आले आहेत. त्यात पुणे शहरातील ३१ तर पिंपरी-चिंचवडमधील १९ रुग्णांचा समावेश आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times