नंदुरबार : नंदुरबारमध्ये रेल्वेच्या डब्याला आग लागल्याची धक्कादायक माहिती समोर आली. गांधीधाम पुरी एक्सप्रेस गाडीला नंदुरबार स्थानकाच्याजवळ अचानक आग लागली. या आगीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, रेल्वे स्टेशनच्या आत येण्याआधीच गाडीने अचानक पेट घेतला. त्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
नंदुरबारमध्ये रेल्वेच्या डब्याला लागलेल्या आगीचं रौद्र रुप
गेल्या दोन तासापासून यामुळे जळगाव ते सुरत मार्गावरील सर्व रेल्वे खोळंबल्या आहेत. प्रवाशांची गर्दी वाढली असून विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. यामुळे करोनाच्या काळात स्थानकावर गर्दी झाली असून भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, या प्रकरणी अधिक तपास सुरू असून आग नेमकी का लागली? याचाही शोध सुरू आहे.