करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर केंद्रसरकारने राज्यासह मुंबईमध्ये चाचण्यांची संख्या कमी करू नये असे निर्देश दिले होते. त्यामुळे मुंबईमध्ये करोना संसर्गाच्या दोन वर्षांच्या काळामध्ये करण्यात आलेल्या चाचण्यांनी एक कोटी पन्नास लाखांचा चाचण्यांचा टप्पा ओलांडला आहे. आतापर्यंत मुंबईमध्ये १,५१,३०,८३१ चाचण्या करण्यात आल्या आहेत. दिल्लीमध्ये ही संख्या ३,४५,७६,७३२ तर प. बंगालमध्ये २,२९,६२,१३०, गुजरातमध्येही ३,७१,०५,२४० तर केरळमध्ये ४,३३,९७,९३८ चाचण्या झाल्या आहेत. या राज्यांच्या तुलनेमध्ये मुंबईमध्ये चाचण्यांची संख्या फार मोठी नसली तरी बंगळुरू शहरातील चाचण्यांच्या तुलनेत ही संख्या अधिक असल्याचे पालिकेने दिलेल्या माहितीवरून स्पष्ट होते.
सार्वजनिक आरोग्य विभागाने दिलेली चाचण्यांची आकडेवारी
राज्य
७ जानेवारी- १,९४,७९०,
१० जानेवारी- १,६६,६३६,
१४ जानेवारी-१,९७,१२९,
१६ जानेवारी- २,०१,३२७,
१९ जानेवारी- २,०१,५०२,
२४ जानेवारी- १,३२,९१४
२६ जानेवारी- १,७३,२५१
मुंबई
१८ जानेवारी- ४७,७००
२० जानेवारी- ५३,२०३
२३ जानेवारी- ४९,८९५
२४ जानेवारी- ३४,३०१
२५ जानेवारी- ३४,४२७
२७ जानेवारी- ४२,५७०