मुंबई: ‘उपमुख्यमंत्री अजित पवार हेच खऱ्या अर्थानं राज्य चालवताहेत, बाकी काही लोक केवळ ‘फेसबुक लाइव्ह’ करण्यामध्ये बिझी आहेत,’ असं खोचक ट्विट करत भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अप्रत्यक्षपणे टोला हाणला आहे.

राज्यात करोना व्हायरसची साथ आल्यापासून सरकारी यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे असे सर्वच जण रोजच्या रोज बैठका घेऊन परिस्थितीचा आढावा घेत आहेत. संबंधित यंत्रणांना मार्गदर्शन करत आहेत. आवश्यक ते निर्णय घेत आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधून काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत. सरकारच्या निर्णयांची माहिती देत आहेत. मुख्यमंत्र्यांसह सर्वांच्याच कामाचं अनेकांकडून कौतुक होत आहे. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही दिलखुलासपणे उद्धव ठाकरे यांचे आभार मानले आहेत.

वाचा:

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन कपातीचं वृत्त काल प्रसिद्ध झालं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या वृत्ताचं तात्काळ खंडन केलं. त्याच अनुषंगानं नीतेश राणे यांनी आज एक ट्विट करून अजित पवारांचं कौतुक केलं आहे. ‘पोलीस व आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांसह इतरांच्या पगार कपातीचा निर्णय मागे घेतल्याबद्दल नीतेश यांनी अजित पवारांना धन्यवाद दिले आहेत. मात्र, उद्धव ठाकरे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे. आपल्या ट्विटमध्ये ते पुढं म्हणतात, ‘शेवटी अनुभव महत्त्वाचा असतो. अजित पवारच खऱ्या अर्थानं राज्य चालवताहेत हेच त्यांनी या निर्णयातून दाखवून दिलंय. इतर काही लोक केवळ फेसबुक लाइव्हमध्ये दंग आहेत.’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here