तेहरान, इराण :

इराणच्या एका व्यक्तीनं आपल्या शरीरावर एकाच वेळी तब्बल ८५ चमचे चिटकावत एक अजब रेकॉर्ड आपल्या नावावर केलाय. ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड‘नं याची नोंद केलीय.

इराणच्या एकेराजच्या ५० वर्षीय अबोलफजल साबर मोख्तारी यांनी ही कामगिरी करून दाखवलीय. हा रेकॉर्ड कायम केल्यानंतर मोख्तारी यांना ‘मॅग्नेट मॅन’ म्हणून ओळखलं जाऊ लागलंय.

मोख्तारी यांना लहानपणापासूनच शरीरावर चमच्यांचं संतुलन कायम करण्याचा छंद लागला होता. लहानपणी एक दिवस अचानक खेळता खेळता आपल्याला या आपल्याच अनोख्या प्रतिभेची ओळख झाली, असं मोख्तारी यांनी म्हटलंय.


US China: स्वतंत्र तैवानचं समर्थन केलं तर युद्ध निश्चित; चीनची अमेरिकेला उघड धमकी
काय सांगता! मानवी हस्तक्षेपाशिवाय ‘रोबोट’नं केली यशस्वी शस्त्रक्रिया
अनेक वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर आणि सरावानंतर मी माझ्या प्रतिभेचा विकास करू शकलो. त्यामुळेच आज मी इथवर पोहचू शकलो, असंही मुख्तारी यांनी म्हटलंय.

एखादी गोष्ट शरीरावर संतुलित करण्यात अपयश आलं असं कधीही घडलेलं नाही. प्रत्येक वस्तूचा पृष्ठभाग आपल्या शरीरावर चिटकवण्याचं कसब मला सहजच जमू शकतं. यामध्ये प्लास्टिक, काच, फळ, दगड, लाकूड आणि अगदी माणूसही अशा सगळ्या गोष्टींचा समावेश आहे, असा दावाही अबोलफजल साबर मोख्तारी यांनी केला आहे.

आपल्या या अजब पण अद्भुत प्रतिभेनंतरही मोख्तारी यांना ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये स्थान मिळवण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी लागलीय. गेल्या उन्हाळ्यातही त्यांनी हा विक्रम मोडण्याचा प्रयत्न केला होता पण हवामानानं साथ न दिल्यानं त्यांना तेव्हा यश मिळू शकलं नाही.

रेकॉर्डसाठी आवश्यक असलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, चमचे विशिष्ट वेळेपर्यंत शरीरावर संतुलित राहायला हवेत. उष्णता आणि घामामुळे मी ८० व्या क्रमांकावर पोहोचताच माझ्या शरीरावरून काही चमचे खाली निसटले होते, अशी आठवणही मुख्तारी यांनी सांगितलीय.

हा रेकॉर्ड कायम करण्यासाठी मुख्तारी यांनी तीन वेळा प्रयत्न केले. त्यानंतर त्यांना हे शक्य झालंय. त्यांच्या अगोदर स्पेनच्या मार्कोस रुइज सेबलोस यांनी हा रेकॉर्ड आपल्या नावावर केला होता. ते आपल्या शरीरावर ६४ चमचे चिपकावण्यात यशस्वी ठरले होते.

वाचा : ‘निओकोव्ह’ या नव्या विषाणूसंबंधी तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचं उत्तर…

वाचा : ‘फिलिपिन्स’ बनला भारतनिर्मित ‘ब्राम्होस’चा पहिला खरेदीदार; २७७० कोटींचा करार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here