विरार: सेक्ससाठी महिलांची फोन कॉल करून मागणी करणाऱ्या शिवसेनेच्या विभागप्रमुखाला एका महिलेने चांगलाच चोप दिला आहे. विरार पूर्वेकडे ही घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. हा शिवसेनेचा विभागप्रमुख रिक्षात बसलेला असतानाच, त्याला महिलेने चपलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विरार पूर्वेकडे हा प्रकार घडला आहे. एका महिलेने शिवसेनेच्या विभागप्रमुखाला रिक्षात बसलेला असतानाच, चपलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या प्रकरणी महिलेने तक्रार दाखल केल्यानंतर विरार पोलिसांनी त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या संशयित आरोपी हा फरार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Maharashtra Police : महिला पोलीस कर्मचाऱ्यांना आता १२ तासांऐवजी ८ तास ड्युटी
Maharashtra police recruitment : राज्यात लवकरच ७ हजार पोलिसांची मेगाभरती

याप्रकरणी महिलेने विरार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संशयित आरोपी हा विरार पूर्वेकडे राहतो. तर पीडित महिलाही विरारमध्ये राहते. त्याने या महिलेला फोन कॉल केला. आयटम आहे का, अशी विचारणा त्याने या महिलेला केली. वारंवार फोन कॉल करून त्रास देत असल्याने तिचा राग अनावर झाला. एका रिक्षात बसलेला असतानाच, त्याला या महिलेने चपलेने मारहाण केली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या महिलेने आरोपीविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सध्या संशयित आरोपी हा फरार आहे. संशयित आरोपीचे कृत्य निषेधार्ह असून, त्याचे समर्थन करता येणार नाही. त्याच्याविरोधात लवकरच कारवाई करण्यात येईल, असे जिल्ह्यातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्राचा गुगल बॉय; या चिमुकल्याचं डोकं नाही, सर्च इंजिन आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here