मुंबईत शनिवारी १४११ नवीन करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. करोनाबाधितांची एकूण संख्या १०, ४४, ४७० वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत एकूण मृतांचा आकडा हा १६६०२ इतका झाला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
गेल्या २४ तासांत ३५४७ रुग्ण बरे झाले असून, त्यांना रुग्णालयातून सोडण्यात आले आहे. एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या १०, १२, ९२१ वर पोहोचली आहे. तर मुंबई महापालिका क्षेत्रात १२१८७ सक्रीय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ३८९६५ जणांच्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत मुंबईत १ कोटी ५१ लाख ९७ हजार ५१६ जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण ९७ टक्के इतके असून, रुग्ण दुपटीचा दर हा ३२२ दिवसांवर आला आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुंबईत सद्यस्थितीत कन्टेंन्मेंट झोन नाही. मात्र, नवीन नियमावलीनुसार १३ इमारती या सील करण्यात आल्या आहेत.
अहवालातील ठळक बाबी
२४ तासांत बाधित रुग्ण- १४११
२४ तासांत बरे झालेले रुग्ण – ३५४७
बरे झालेले एकूण रुग्ण – १,०१२,९२१
बरे झालेल्या रुग्णांचा दर – ९७ टक्के
एकूण सक्रिय रुग्ण – १२१८७
दुपटीचा दर- ३२२ दिवस
कोविड वाढीचा दर (२२जानेवारी-२८ जानेवारी)- ०.२१ टक्के